यंत्रमाग उद्योगाप्रश्नी पुन्हा संघर्ष करणार; प्रकाश आवाडेंचा इशारा

इचलकरंजी शहरासाठी महत्वकांक्षी असलेली दुधगंगा योजना लवकरच मार्गी लागेल.
यंत्रमाग उद्योगाप्रश्नी पुन्हा संघर्ष करणार; प्रकाश आवाडेंचा इशारा

इचलकरंजी : यंत्रमाग उद्योगाचा (auto-loom industry) कोणताही प्रश्न मार्गी लागलेला नाही. सर्व प्रश्न जैसे थे आहेत. महापूराचे संकट संपल्यानंतर याप्रश्नी पून्हा एकदा शासनाबरोबर संघर्ष करणार आहे. यामध्ये निर्णय घेवूनच माघार घेणार आहे, असा इशारा आमदार प्रकाश आवाडे (prakash aawade) यांनी दिला. येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या ठिकाणी जलकुंभ उभारण्याच्या कामाच्या भूमीपूजन कार्यक्रमप्रसंगी आमदार आवाडे बोलत होते. इचलकरंजी (ichalakaranji) शहरासाठी महत्वकांक्षी असलेली दुधगंगा योजना लवकरच मार्गी लागेल, असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

तत्पूर्वी, त्यांच्यासह नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्याहस्ते विधीवत भूमीपूजन कार्यक्रम झाला. आमदार आवाडे म्हणाले, पाणी हा राजकारणाचा विषय नाही. हा गावचा विषय आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मार्गी लागला पाहीजे. त्यासाठी दुधगंगा योजनेचे काम गाजावाजा न करता यावर्षी सुरु करा. उद्घाटनही ऑनलाईन करा. सगळेजण या योजनेला सहकार्य करण्यास तयार आहेत. तोरणानगर हा परिसर सर्वाधिक पाणी टंचाईचा भाग आहे. त्यामुळे या भागातही नव्याने जलकुंभ बांधा. त्यामुळे संपूर्ण शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागेल.

यंत्रमाग उद्योगाप्रश्नी पुन्हा संघर्ष करणार; प्रकाश आवाडेंचा इशारा
RT-PCR विना कर्नाटकात प्रवेश देऊ नये; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नगराध्यक्षा स्वामी, नगरसेवक मदन कारंडे, विठ्ठल चोपडे, मनोज साळुंखे, रवी रजूपते यांची भाषणे झाली. याप्रसंगी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, जेष्ठ नगरसेवक अजितमामा जाधव, राहूल खंजीरे, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल, नगरसेविका अनिता कांबळे, महादेव गौड, प्रकाश दत्तवाडे आदी उपस्थीत होते.

१) शुध्द पेय जल प्रकल्पा प्रश्न उपस्थीत

शहरात १०० ठिकाणी उभारण्यता येत असलेल्या शुध्द पेयजल प्रकल्पाच्या रखडलेल्या प्रश्नांबाबत यावेळी आमदार आवाडे यांनी लक्ष वेधले. मी हा निधी आणला म्हणून हे काम थांबले आहे काय, अशी विचारणा करीत चांगल्या कामासाठी इर्षा करुया व गावाचा विकास करुया, असे आवाहन यावेळी केले.

२) 'आयजीएम'बाबत माझ्यावर जळफळाट

आयजीएम रुग्णालय (IMG hospital) शासनाकडे गेल्यापासून कोणाचेच लक्ष नाही. पण माझे बारीक लक्ष आहे. त्यामुळे माझ्यावर कांहीजण जळफळाट काढत आहेत, अशी जोरदार टिका आमदार आवाडे यांनी यावेळी केली. आयजीएम रुग्णालय कोणत्याही परिस्थीतीत टकाटक केले जाईल, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यंत्रमाग उद्योगाप्रश्नी पुन्हा संघर्ष करणार; प्रकाश आवाडेंचा इशारा
पूरग्रस्तांना भरपाईसाठी विमा कंपन्यांनी टाळाटाळ केल्यास कडक कारवाई करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com