राधानगरी : पावसाळा (Monsoon Update) सुरू होण्यापूर्वीच राधानगरी धरण (Radhanagari Dam) निम्मे भरले आहे. धरणातील आजचा पाणीसाठा ३.९६ टीएमसी होता. धरणाची क्षमता ८.३६ टीएमसी आहे. वेधशाळेने यंदा पाऊस लवकर सुरू होणार, असा अंदाज देऊनही भोगावती नदीवरील (Bhogavati River) एकूण १४ बंधाऱ्यांतील बरगे काढण्याचे काम झालेले नाही. त्यामुळे आजघडीला धरणातून विसर्ग ५०० क्युसेकपेक्षा अधिक विसर्ग करण्यावर मर्यादा येत आहेत.