esakal | Kolhapur Rain : राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले
sakal

बोलून बातमी शोधा

Two automatic doors opened for kolhapur radhanagari dam

Kolhapur Rain: राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले

sakal_logo
By
मोहन नेवडे

राधानगरी (कोल्हापूर) : पाणलोट क्षेत्रातील संततधार पावसाने,जलाशय पाणी पातळीत वाढ झाल्याने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे आज दुपारी पुन्हा खुले झाले. या दरवाजातून 2856 तर वीज निर्मितीसाठी सोडलेले 1400 असा 4256 क्युसेस पाणी विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे. यंदाच्या पावसाळ्यात स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची ही सातवी वेळ आहे.

धरणक्षेत्रात गेल्या चोवीस तासात 43 मिलिमीटर पाऊस झाला.मात्र पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक आहे. दरम्यान पाणलोट क्षेत्रातील गेल्या दोन दिवसातील पावसाने पाणीसाठ्यात वाढ झाल्याने काळम्मावाडी धरण आज दुपारी 98 टक्के भरले.

हेही वाचा: राजकारणात पुन्हा सक्रिय होणार; कुणबी मेळाव्यात गीतेंची मोठी घोषणा

धरणात 25 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.धरण पूर्ण भरण्यास आता केवळ अर्धा टीएमसी पाणी साठा होणे बाकी आहे. या धरणातून वीज निर्मितीसाठी 900 क्‍यूसेस पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास तीन चार दिवसात हे धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे.धरणक्षेत्रात 24 तासात 46 मिलिमीटर पाऊस झाला.

loading image
go to top