Radhanagari Dam Water Release in Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर सतत वाढत आहे. या मुसळधार पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3 आणि 6 सकाळी लवकर उघडला आहे.