Radhanagari Dam Water Release : राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले; भोगावती नदी पात्रात 4 हजार 256 क्युसेक विसर्ग, कोल्हापुरातील 35 बंधारे पाण्याखाली

Radhanagari Dam Water Release Today : राधानगरी धरणाच्या स्वयंचलित द्वारामधून २ हजार ८५६ व पावर हाऊस मधून १४०० असा एकूण ४ हजार २५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
Radhanagari Dam automatic gates opened

Radhanagari Dam automatic gates opened

esakal

Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात ८.३५ टीएमसी पाणीसाठा आहे. आज राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक ३ व ६ हे खुले झाले आहेत. या स्वयंचलित द्वारामधून २ हजार ८५६ व पावर हाऊस मधून १४०० असा एकूण ४ हजार २५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील ३५ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात आज सरासरी ६.४ मिमी पाऊस पडला. नदीची पाणी पातळी मध्यरात्री १२ वाजता ३० फूट सहा इंच इतकी (Kolhapur radhanagari dam water level latest update) होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com