
मोहन नेवडे
राधानगरी : जलसंपदा विभागाच्या प्रस्तावानुसार राधानगरी धरणाला वक्राकार दरवाजे (रिडल गेट) बसविण्याच्या प्रस्तावित योजनेचे डिझाईन तयार करण्याचे काम मध्यवर्ती संकल्प चित्र संघटनेकडून (सीडीओ नाशिक) हाती घेतले आहे. योजनेची अंमलबजावणी जागतिक बँकेचे निर्देशानुसार करावी लागणार आहे. यामुळे डिझाईन कार्यवाही गतीने सुरू आहे. जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी ही माहिती दिली.