
-मोहन नेवडे
राधानगरी : राधानगरी - दाजीपूर वन्यजीव अभयारण्याच्या पर्यटनदृष्ट्या विकासाच्या ३२ कोटी खर्चाच्या आराखड्याला महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास महामंडळाने डिसेंबर २०२१ मध्ये तत्वतः मान्यता दिली. मात्र, प्रत्यक्षात निधीची तरतूद झाली नाही. परिणामी, अंमलबजावणी कागदावरच राहिली आहे.