esakal | राधानगरीत झाडासह डोंगराचा भाग घरात घुसुन 3 महीला जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

राधानगरीत  झाडासह डोंगराचा भाग घरात घुसुन 3 महीला जखमी

राधानगरीत झाडासह डोंगराचा भाग घरात घुसुन 3 महीला जखमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राशिवडे (कोल्हापूर): शिरगाव (ता. राधानगरी) (Radhanagri)येथे अतीवृष्टीमुळे भुस्खलन होवून झाडासह डोंगराचा भाग घरात घुसुन एका घराचे मोठे नुकसान झाले. यात तीन महीला किरकोळ जखमी झाल्या. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने जिवीत हानी झालेली नाही.

मुळातच हे गाव टेकडीवर आणि टेकडीच्या सभोवती वसले आहे. अलीकडे कांही वर्षात धामोडकडे जाणाऱ्या घाटरस्त्यावर डोंगर उताराला अनेकांनी घरे बांधली आहेत. याच परिसरात शिवाजी बापू पाटील यांचेही बंगला वजा घर आहे. याच्या पश्चिमेला टेकडी आहे. गेल्या चार दिवसाच्या पावसाने या परिसरातील जमीनी उघळू लागल्या आहेत. यात अनेक मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले असून भूस्खलनामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. (Radhanagari-rain-incident-3-women-injured-kolhapur-rain-update-akb84)

आज पाटील यांच्या घराच्या पश्चिमेकडील टेकडी चा काही भाग घसरला. तिथे असलेले एक झाड दगड-माती बरोबर घसरत घरावर आले व घराच्या हॉलमध्ये घुसले. मोठ्या आवाजामुळे घरात असलेल्या श्री. पाटील यांच्या पत्नी' मुलगा व दोन सुना घाबरल्या व यामध्ये किरकोळ जखमी झाले. त्यांचा मुलगा उदय घराबाहेर याच परिसरात पाण्याचा निचरा करीत होते. सुदैवाने जीवित हानी झाली नाही, पण घराचे मोठे नुकसान झाले आहे. भिंतीवर मोठा दाब पडल्याने संपूर्ण भिंत कोसळली चिखल माती दगडगोटे व वृक्षांच्यासह पाण्याचा मोठा प्रवाह त्यांच्या घरामध्ये शिरला.

दरम्यान या भागातील युवक व ग्रामस्थ नातेवाईकांनी घटनास्थळी जाऊन सर्व जखमींना सुरक्षित स्थळी हलविले व कौटुंबिक साहित्याचे नुकसान टाळले. दरम्यान त्यांच्याच घराच्या वरच्या बाजूला राहत असलेल्या मधुकर दत्तात्रय चरापले यांच्या घराचे नुकसान झाले आहे. तर दोन दिवसापूर्वी एसटी स्टँड शेजारी राहत असलेल्या कृष्णात पाटील व महादेव पाटील यांच्या राहत्या घरावर व सदाशिव कांबळे यांच्या जनावरांच्या छप्पर वजा शेडवर दरड कोसळल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: पंचगंगा नदीवरील जूना पूल पाण्याखाली: नागरिकांना सतर्कतेचा इशारा

राधानगरीचे पोलीस निरीक्षक उदय डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णात यादव, खंडेराव लोकरे, सुरेश मेटील भैरवनाथ पाटील ,भाग्यश्री रहाट यांनी घटनास्थळी भेट देऊन आपत्तीकालीन मदत केली. रात्री उशिरा मंडळ अधिकारी शिवाजीराव भोसले, तलाठी सरदार चौगले, पोलीस पाटील संजय कांबळे सरपंच सौ रुपाली व्हरकट, उपसरपंच प्राचार्य शरद कांबळे व सदस्य यांनी पंचनामा केला. या परिसरात पाऊस जोराचा आहे. जवळच असलेल्या तुळशी धरण क्षेत्रावर आज दिवसभरात चारशे मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामुळे या परिसराला अजूनही धोका आहे. आजची ही घटना रात्री घडली असती तर मोठा अनर्थ झाला असता. या गावाची रचना टेकडी भोवती असल्याने अतिवृष्टीत गावाला भूस्खलणाचा धोका अधिक आहे. अशातच धामोड घाटामध्ये पूर्वेकडे बांधलेली मोठमोठे बंगले आणि घरे या कक्षेत येतात.

loading image