Railway Recruitment Setback : रेल्वे भरतीतील संधी ३ मार्कांनी हुकली; भामटेमधील २३ वर्षीय युवतीने घेतला टोकाचा निर्णय

23-Year-Old Woman From Bhamte Dies in Tragic Incident : रेल्वे भरती परीक्षेत दोन गुणांनी संधी हुकल्यानंतर भामटे येथील २३ वर्षीय वैष्णवी पाटील मानसिक तणावाखाली होती.
Railway Recruitment Setback

Railway Recruitment Setback

esakal

Updated on

कोल्हापूर : रेल्वे भरती परीक्षेतून मिळणारी संधी दोन गुणांनी हुकल्यानंतर आलेल्या नैराश्यातून एका तरुणीने मृत्यूला कवटाळले. भामटे (ता. करवीर) येथील वैष्णवी रामचंद्र पाटील (वय २३) हिने घरात काल रात्री आत्महत्या केली.

अभ्यासात हुशार असलेल्या या मुलीच्या अशा अंतामुळे गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत करवीर पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः तिने बी. कॉम. पूर्ण केले होते. वडील शेतकरी तर आई गृहिणी आहे.

Railway Recruitment Setback
ज्यांच्या ठसक्याने रंगायचा लावणीचा फड! त्या शकुंतलाताई नगरकर काळाच्या पडद्याआड, कलाविश्वावर शोककळा

कौटुंबिक परिस्थितीची जाणीव असलेल्या वैष्णवीने दोन वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. तिने एकापाठोपाठ अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या. मात्र, यश सातत्याने हुलकावणी देत होते. यामुळे ती गेल्या दोन महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होती.

त्यातच तिने सोमवारी रात्री टोकाचा निर्णय घेतला. तिचे वडील रामचंद्र पाटील रात्री नऊच्या सुमारास नियमित कामासाठी गोठ्यात गेले असता, त्यांना वैष्णवी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. हे दृश्य पाहताच त्यांनी हंबरडा फोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com