पाऊस ६ जून २०२४

पाऊस ६ जून २०२४

जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी
कोल्हापूर, ता. ६ : जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह ठिकठिकाणी मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर शहरात तुरळक तर, गगनबावडा, शाहुवाडी, राधानगरी, भुदरगड तालुक्यात अनके ठिकाणी जोरदार पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व वातावरण तयार झाले आहे. केरळमध्ये दाखल झालेला मॉन्सून लवकरच दक्षिण महाराष्ट्र व्यापणार आहे. त्यानंतर कोकणसह पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सून तळ ठोकेले असा अंदाज व्यक्त केला आहे. जिल्हा आज दुपारपासून ढगाळ वातावरण आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊसही झाला. शिये, शेंडा पार्क, शिवाजी विद्यापीठ, फुलेवाडी परिसरात दुपारी मध्यम स्वरुपाचा पावसाने दिलासा दिला. दरम्यान, अजूनही मोठ्या पावसाची वाट पाहिली जात आहे. आजरा शहरासह तालुक्यातील विविध गावात पाऊस सुरु आहे.

गडहिंग्लजला होळकर चौक जलमय
गडहिंग्लज ः शहरासह परिसरात आणि विशेष करून पश्चिम भागात आज (गुरूवार) सायंकाळी मॉन्सूनपूर्व मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे शहरातून गेलेला संकेश्वर-आंबोली हायवे अहिल्यादेवी होळकर चौकात पाण्याखाली बुडाला. पावसाच्या पाण्यात बुडणारा हायवे पहिल्यांदाच बघत असल्याच्या प्रतिक्रिया शहरवासियांतून येत आहेत.मे महिन्यात झालेल्या दोन ते तीन मुसळधार वळीव पावसातही हा चौक जलमय झाला होता. त्यानंतर उपाययोजनेची संधी असतानाही पालिका अथवा महामार्ग प्रशासन डोळेझाक केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com