कागल शहरासह तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने हजेरी लावली. काल रात्री पावणे आठच्या सुमारास १५ मिनिटे पडलेल्या पावसामुळे वाढत्या उष्म्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
इचलकरंजी : शहरात सोमवारी रात्री काही भागात पावसाने हजेरी लावली. हलकी एक सर येऊन गेली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. बेळगांव जिल्ह्यातील काही भागांतही पावसाच्या सरी बरसल्या.