esakal | मुसळधारेमुळे पंचगंगा पात्राबाहेर; गावांना सतर्कतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

मुसळधारेमुळे पंचगंगा पात्राबाहेर; गावांना सतर्कतेचा इशारा

मुसळधारेमुळे पंचगंगा पात्राबाहेर; गावांना सतर्कतेचा इशारा

sakal_logo
By
ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : जिल्ह्यात कालपासून (kolhapur rain update) झालेल्या दमदार पावसामुळे पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. शहरातही मंगळवारी रात्रीपासून सतत पाऊस पडत आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा (MID) इशारा दिल्याने प्रशासकीय पातळीवर सर्व आपत्ती यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पावसाने जुलैच्या सुरुवातीला दडी मारली. आषाढ कोरडाच जाणार का असा प्रश्न सर्वांसमोर पडला. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांसमोर (heavy rain) उभे ठाकले होते. मात्र गेल्या चार दिवसापासून पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केली आहे.

हेही वाचा: कोल्हापुरात तृतीयपंथीचा मृत्यू; घात की अपघात? पोलिस तपास सुरु

जिल्ह्याच्या सर्व भागात पावसाच्या सरी बरसल्या असून नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. आज सकाळी पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. रंकाळ्याच्या पाण्यात पाणी पातळीतही वाढ झाली. कळंबा तलावातील पाणी सांडव्यावरून वाहू लागले आहे. राजाराम बंधाराही पाण्याखाली गेला आहे. उपनगरांमध्ये वीज पुरवठा खंडीत करण्यात आला असून त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. आज सकाळी अकरा वाजेपर्यंत जोरदार पाऊस होता. त्यानंतर दुपारी काही काळ पावसाने विश्रांती घेतली. ढगाळ वातावरण मात्र दिवसभर असून नागरिकांना आज सूर्यदर्शन झाले नाही. हवामान खात्याने पुढील ४८ तास अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. नदीकाठी असणाऱ्या गावांना धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे. काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्याने वाहतूर ठप्प झाली आहे.

loading image