वरपेंना मारहाण करणाऱ्या राजेश क्षीरसागरांवर कडक कारवाई करा; दानवेंचा पोलिस अधीक्षकांनाच इशारा

वरपे यांना मारहाण करणारे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर कोण?
Rajendra Varpe case Opposition leader Ambadas Danve
Rajendra Varpe case Opposition leader Ambadas Danveesakal
Summary

‘हे क्षीरसागर कोण आहेत? त्यांच्यावर वरपे यांच्या तक्रारीनुसार तुम्ही गुन्हा का दाखल केला नाही.'

कोल्हापूर : वरपे यांना मारहाण करणारे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर कोण? त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? पोलिस आणि क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांची दादागिरी चालणार नाही. वरपे यांचा जबाब जबाबदार अधिकाऱ्यांना घ्यायला सांगा आणि त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करा नाही तर येणाऱ्या अधिवेशनात तुमच्यावर कारवाई करण्याची मागणी करेन, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पोलिस अधीक्षकांना दिला.

त्यानंतर तत्काळ पोलिस उपाधीक्षक अजित टिके दानवे यांच्या भेटीला आले. दानवे यांनी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहात जनता दरबार घेतला. यावेळी शिवसेने (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले राजेंद्र वरपे (Rajendra Varpe) यांना घेऊन आले. नियोजन मंडळाचे कार्यकारी कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या मुलाने मारहाण केली असून, त्यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही, असे दानवे यांना सांगितले.

Rajendra Varpe case Opposition leader Ambadas Danve
'आय किल्ड अभिषेक, वो कल मनाली नहीं जायेगा!'; घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या अन् मॉरिस जोरजोरात ओरडू लागला

त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना फोन केला. दानवे म्हणाले, ‘हे क्षीरसागर कोण आहेत? त्यांच्यावर वरपे यांच्या तक्रारीनुसार तुम्ही गुन्हा का दाखल केला नाही. मी दुपारी वरपे यांच्या घरी जाणार आहे. तोपर्यंत जबाब घेतला असला पाहिजे.’ त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी सावंत आणि पोलिस उपाधीक्षक अजित टिके जनता दरबारात आले. त्यांनी वरपे यांना कार्यालयात पाठवा आम्ही त्यांचा जबाब घेतो असे आश्वासन दिले. त्यानंतर वरपे तेथून निघून गेले.

दानवे म्हणाले, ‘जनता दरबारात ३३० निवेदने आली. त्यातील १२० जणांना पत्रे दिली. ५० जणांचे प्रश्न जागेवर सोडवले. जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार सत्तेचा उपयोग केवळ मिरवण्यासाठी करतात असे लोकांच्या प्रश्नांवरून दिसते.’ संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते संजय पवार, जिल्हा प्रमुख विजय देवणे, माजी आमदार उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर उपस्थित होते.

Rajendra Varpe case Opposition leader Ambadas Danve
बैल थकलेला असेल तर शर्यत जिंकणं कठीण, तसंच क्षमता संपलेला नेता असेल तर..; रवींद्र चव्हाणांचा पृथ्वीराज चव्हाणांना टोला

कार्यालयीन कामासाठी मी नाशिकला आलो आहे. दुपारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांचा फोन आला होता. त्यांना मी वरपे प्रकरणातील सर्व प्रक्रिया सांगितली. वरपे यांनी सीसीटीव्ही फुटेजसाठी डीव्हीआर आणून दिला तर फुटेजची खातरजमा करता येईल. तसेच जबाब दिल्यास त्यावरून पुढील कार्यवाही केली जाईल. त्यांनी तक्रार दिल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्याचे कर्मचारी त्यांच्या घरी गेले. त्यावेळी त्यांचे कुटुंबीय तेथे नव्हते.

- महेंद्र पंडित, पोलिस अधीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com