'आय किल्ड अभिषेक, वो कल मनाली नहीं जायेगा!'; घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या अन् मॉरिस जोरजोरात ओरडू लागला

मुंबईतील दहिसर भागातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
Abhishek Ghosalkar Firing Case
Abhishek Ghosalkar Firing Caseesakal
Summary

कार्यालयात गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसनं रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या अभिषेक घोसाळकरला (Abhishek Ghosalkar) ऑफिसबाहेर फरफट नेल्याचं एका साक्षीदारानं सांगितलं.

Abhishek Ghosalkar Firing Case : आपल्या कार्यालयात बैठकीसाठी बोलावून शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर आरोपी मॉरिस नोरोन्हा (Morris Noronha) हा कार्यालयाबाहेर हातात रिव्हॉल्वर घेऊन बाहेर आला.

त्यानंतर तो मोठ्या आवाजात 'आय किल्ड अभिषेक, वो कल मनाली (Manali) नहीं जायेगा, असं जोरात ओरडला. दरम्यान, 13 फेब्रुवारीला अभिषेक घोसाळकर यांच्या लग्नाचा वाढदिवस (Wedding Anniversary) होता. मनालीत वाढदिवस साजरा करण्याचं नियोजनही अभिषेक यांनी केलं होतं. मात्र, त्यापूर्वीच ही घटना घडली.

Abhishek Ghosalkar Firing Case
Abhishek Ghosalkar Firing: ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर दहिसरमध्ये गोळीबार, FB लाईव्ह दरम्यान झाडल्या गोळ्या Video Viral

कार्यालयात गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसनं रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या अभिषेक घोसाळकरला (Abhishek Ghosalkar) ऑफिसबाहेर फरफट नेल्याचं एका साक्षीदारानं सांगितलं. त्यानंतर जेव्हा अभिषेक समर्थक आणि लोक जमायला लागले, तेव्हा तो जमाव बघून घाबरून मॉरिस भाईनं त्या पिस्तुलानं स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली, असं बोललं जातंय.

Abhishek Ghosalkar Firing Case
Abhishek Ghosalkar Firing: अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिस नोरोन्हाचा मृत्यू; कोण आहे मॉरिसभाई?

मॉरिसला शस्त्र परवाना नव्हता

गोळीबारात वापरलेलं शस्त्र हे अवैध शस्त्र असल्याचा संशय आहे. मॉरिसला शस्त्र परवाना नव्हता, असं सांगितलं जातंय. मात्र, मॉरिस भाईकडं हे शस्त्र कुठून आणि कसं मिळालं, याचा तपास पोलीस करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com