esakal | 'शासनाकडून रक्तपेढीला मिळणाऱ्या मदतीत सातत्य असावे'
sakal

बोलून बातमी शोधा

'शासनाकडून रक्तपेढीला मिळणाऱ्या मदतीत सातत्य असावे'

'शासनाकडून रक्तपेढीला मिळणाऱ्या मदतीत सातत्य असावे'

sakal_logo
By
मोहन मिस्त्री

कोल्हापूर : राजर्षी शाहू ब्लड बॅंक (blood bank) सेंटर नवीन वास्तूत स्थलांतर होत आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती (shahu maharaj) आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांच्या उपस्थितीत सेंटरचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी (16) जुलै रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर उपस्थित असणार आहेत. शाहू ब्लड बॅंक सेंटरचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ही महिती दिली. यावेळी कोरोना महामारीच्या काळात कार्य केलेल्या अनेकांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सिंगल डोनर प्लेटलेट दाता आणि शंभर वेळा रक्तदान केलेल्या नागरिकांचाही सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती ब्लड बँकेचे अध्यक्ष व्ही. बी पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले, खाजगी रक्तपेढींना परवानगी देताना बंधन असावीत. रक्तदान हे व्यापारी होऊ नये. रक्तदात्यांना गिफ्ट देऊन रक्तदान करणे हे प्रकार थांबवण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. शासनाकडून रक्त पेढीला मिळणाऱ्या मदतीमध्ये सातत्य असावे अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा: पंकजा मुंडे नाराजगी व्यक्त करतील पण बंड नाही - पाटील

शाहू ब्लड बँक कोल्हापूर जिल्ह्यासाठी रक्त पुरवठा करते. रक्त विघटन आणि प्लेटलेट डोनरची अद्यावत यंत्रणा नव्या वास्तुमध्ये सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. इतर बँकांप्रमाणे राज्यांत अधिक दराने रक्तदान केलेले रक्त पुरवली जात नाहीत. त्याप्रमाणे रक्तदात्यांना दिलेल्या कार्डवर एक वर्षभर किंवा अगदी पाच वर्षानंतरही त्याला बदली रक्ताची बॅग दिली जाते, असाही खुलासा त्यांनी केला. एस. डी. पी. सिंगल डोनर प्लेट्सलेट ही यंत्रणा ब्लड बँकेत एमडी पॅथॉलॉजी असलेल्या डॉक्टर अक्षता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

loading image