राज्य सरकार, साखर कारखानदार व राज्य साखर संघ हे सर्वजण मिळून शेतकऱ्यांच्या विरोधात कटकारस्थान करत असले तरी मंगळवारी या सुनावणीचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागणार असल्याचा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला.
जयसिंगपूर : एकरकमी एफआरपी कायम करण्याच्या उच्च न्यायालयातील (High Court) याचिकेवरील निर्णय अंतिम असताना आज राज्य साखर संघाने दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेवर मुदत मागून राज्य साखर संघाकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालविण्याचा उद्योग केला असल्याची टीका राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली.