esakal | राजू शेट्टी भडकले: सत्ता सुंदरी नसल्याने शेलार आणि टोळक्यांची अवस्था देवदास सारखी
sakal

बोलून बातमी शोधा

raju shetti Leader of Swabhimani Shetkari Sanghatana former MP angry on MLA  ashish shelar comment

पिंजरा सिनेमात मास्तरांनी एका मोहापायी शिक्षक असताना हाती तुणतुणे घेतले.

राजू शेट्टी भडकले: सत्ता सुंदरी नसल्याने शेलार आणि टोळक्यांची अवस्था देवदास सारखी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर:  सत्ता सुंदरी हातातून निसटल्याने आमदार आशिष शेलार आणि त्यांच्या टोळक्याची अवस्था देवदास सारखी झालीय असे प्रत्यूतर माजी खासदार राजू शेट्टी  यांनी दिले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात विधानपरिषदेच्या मोहापायी तमाशातील तुणतुणे हातात घेण्याची वेळ एका शेतकरी नेत्यावर आली आहे.असा टोला माजी खासदार राजू शेट्टी  यांचे नाव न घेता आमदार आशिष शेलार यांनी  येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चा व रयत क्रांती संघटना यांनी योजलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रेत शेलार  यांनी टोला लगावला होता. यावर राजू शेट्टी यांनी लगेच प्रत्यूतर दिले.

यावर शेट्टी  म्हणाले, सत्ता सुंदरी हातातून निसटल्याने आशिष शेलार आणि त्यांच्या टोळक्याची अवस्था देवदास सारखी झालीय. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पद मिळवताना पवारांचे पाय चाटायला कोण गेलं होतं? असा  सवाल ही आशिष शेलार यांना राजू शेट्टी यांनी केला.

हेही वाचा- आमदारकीच्या मोहापायी राजू शेट्टी यांची अवस्था पिंजरा तील मास्तर सारखी -

आशिष शेलार टिका करताना म्हणाले होते की, पिंजरा सिनेमात मास्तरांनी एका मोहापायी शिक्षक असताना हाती तुणतुणे घेतले. तशीच मोहाची भुमिका विधानपरीषदेच्या आमदारकीसाठी शेतकऱ्यांचे नेते म्हणवून घेणाऱ्यांनी घेतली आहे, असा टोला लगावून अडत दलालांची वकिली करणाऱ्यांना आम्ही जुमानत नाही. हिंमत असेल तर त्यांनी केलेले कायदे बदलून दाखवावेत. असे आव्हान आमदार शेलार यांनी माजी खा. राजू शेट्टीचे नाव न घेता दिले.

संपादन- अर्चना बनगे

loading image