Raju Shetti : 'एफआरपी देण्यासाठी केंद्राने कर्जपुरवठा करावा'; राजू शेट्टींची मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे मागणी

Raju Shetti : देशातील साखर कारखाने उत्पादित साखरेवर १० ते १४ टक्के व्याजदराने मालतारण कर्ज काढून ऊस उत्पादकांची एफआरपी आदा करतात.
Former MP Raju Shetti
Former MP Raju Shettiesakal
Updated on
Summary

मंत्री मोहोळ यांनी सकारात्मकता दर्शवित नाबार्डच्या माध्यमातून कशा पद्धतीने कारखानदारांना मदत करता येईल याबाबत अहवाल सादर करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले.

जयसिंगपूर : देशातील साखर कारखाने उत्पादित साखरेवर १० ते १४ टक्के व्याजदराने मालतारण कर्ज काढून ऊस उत्पादकांची एफआरपी आदा करतात. यामुळे कारखान्यांवर पडणाऱ्या व्याजाचा भुर्दंड कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नाबार्ड अथवा एनसीडीसीमार्फत चार टक्के व्याज दराने कर्जपुरवठा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्याकडे केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com