esakal | 'परिक्रमेत कोणताही अडथळा येणार नाही; भुमिका वाडीतच जाहीर करु'
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Shetti criticized Maharashtra government over APMC decesion

नृसिंहवाडी येथे जात असताना आमच्याकडून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही.

'परिक्रमेत कोणताही अडथळा येणार नाही; भुमिका वाडीतच जाहीर करु'

sakal_logo
By
स्नेहल कदम

कोल्हापूर : नृसिंहवाडी येथे जात असताना आमच्याकडून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक सकाळापासून माझ्या संपर्कात आहेत. (Raju shetti) या परिक्रमेत कोणताही अडथळा येणार नाही अथवा करणार नाही असा शब्द त्यांनी आम्हांला दिला आहे. (raju shetti parikrama) आमची नेमकी भुमिका तेथे जाऊन आम्ही जाहीर करु असे वक्तव्य स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले आहे. (kolhapur update)

यावेळी शेट्टी म्हणाले, आंदोलनामध्ये लोक सहभागी झाल्याने प्रशासन हादरले आहे. प्रशासनाला याची दखल घ्यावी लागणार आहे. गेले चार दिवस गावागावांत झालेल्या परिक्रमेसाठी मोठ्या संख्येने पूरग्रस्त सहभागी झाले आहेत. या परिक्रमेतून पूरग्रस्तांना काही प्रमाणात दिलासा मिळवून द्यायचा आहे. शिवाय हे पुन्हा होऊ नये यासाठी काही दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता करायची असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: Raju Shetti Parikrama - पंचगंगेचे लोखंडी कठडे दोराने केले बंदिस्त

महापूरामुळे नुकसानग्रस्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात्मक पदयात्रेची सांगता आज सायंकाळी श्री. क्षेत्र नृसिंहवाडी येथे होणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंचगंगेची परिक्रमा सुरु आहे. दरम्यान पोलिस प्रमुखांच्या उपस्थितीत पूलाजवळ बंदोबस्तासाठी असलेले 100 हून अधिक पोलिसांनी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुलाचे लोखंडी कठडे दोरीच्या साह्याने बंदिस्त केले आहेत.

कृष्णा-पंचगंगा संगम घाटाकडे जाणारे सर्व मार्ग पोलिस यंत्रणेकडून बंद केले आहेत. पोलिस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली गेली आहे. कृष्णा-पंचगंगा नदीपात्रामध्ये राजू शेट्टी यांच्या जलसमाधी प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाच्या वतीने बोटी व मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा: कोल्हापूरला भुकंपाचा सौम्य धक्का; नागरिकांत भीतीचे वातावरण

loading image
go to top