esakal | कोल्हापूर - पोलिसांची नजर चुकवत 2 पुरग्रस्तांचा जलसमाधीचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर - पोलिसांची नजर चुकवत 2 पुरग्रस्तांचा जलसमाधीचा प्रयत्न

कोल्हापूर - पोलिसांची नजर चुकवत 2 पुरग्रस्तांचा जलसमाधीचा प्रयत्न

sakal_logo
By
जितेंद्र आणुजे

कोल्हापूर : राजु शेट्टी यांच्या नेतृत्वात सुरु असलेले आंदोलन एका आंदोलकाने पुर्ण केले आहे. एका पुरग्रस्ताने पोलिसांची नजर चुकवून नदीमध्ये उडी टाकली आहे. राजु शेट्टींचे या परिसरात आगमन होण्याआधीच या कार्यकर्त्यांने आंदोलन यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पोलिसांची नजर चुकवुन आंदोलकाने थेट नदीत उडी टाकली आहे. दरम्यान कृष्णा नदी परिसरात या घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. मात्र जीवरक्षक बोटींच्या साहाय्याने या कार्यकर्त्याला बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान या घटनेमुळे काही काळासाठी या भागत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: Raju Shetti Parikrama - पंचगंगेचे लोखंडी कठडे दोराने केले बंदिस्त

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रयाग चिखली येथून गेली पाच दिवस पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी पदयात्रा सुरू आहे. यामध्ये शेकडो शेतकरी बांधव सहभागी झाले आहेत. शासन भूमिकेच्या विरोधात घोषणा देत आज ठीक 4 वाजता कुरुंदवाड येथे राजू शेट्टींच्या शेतकरी बांधवांचे आगमन झाले. तत्पूर्वी कुरुंदवाड यादव पुलाच्या बाजूने सायंकाळी ठिक सव्वाचार वाजता पंचगंगा नदीपात्रात शिरढोण येथील 45 वर्षीय शेतकऱ्यानं थेट उडी टाकली.

हेही वाचा: 'परिक्रमेत कोणताही अडथळा येणार नाही; भुमिका वाडीतच जाहीर करु'

शेतजमीनीचा भाग असल्यामुळे शेतकऱ्याला खाली नदीपात्राकडे उतरता आले नाही. त्याने थेट नदीपात्रात उडी टाकली. त्यावेळी चार ते पाच सेकंद तो पाण्यात बुडाला. यावेळी या ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या येथील वजीर रेस्क्यू फोर्स व रौफ पटेल यांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर नृसिंहवाडीतील कृष्णा व पंचगंगा येथील संगमावर उभ्या असणाऱ्या रुग्णवाहिकेतून त्याला पुढील उपचारासाठी पाठवले आहे.

loading image
go to top