esakal | राजू शेट्टींच्या जलसमाधी आंदोलनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
sakal

बोलून बातमी शोधा

राजू शेट्टींच्या जलसमाधी आंदोलनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

आज सकाळी जलसमाधी यात्रा हेरवाड तेरवाड कुरुंदवाडहून नृसिंहवाडीला जाणार आहे.

राजू शेट्टींच्या जलसमाधी आंदोलनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पूरग्रस्तांना भरपाई देण्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आज नृसिंहवाडी येथे आंदोलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलातर्फे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ४३ अधिकाऱ्यांसह ३८० पोलिसांची फौज बंदोबस्तासाठी सज्ज राहणार आहे. अपर पोलिस अधीक्षक : १, पोलिस उपअधीक्षक : २, पोलिस अधिकारी : ४३, पोलिस कर्मचारी : ३८० असा बंदोबस्त असणार आहे.

हेही वाचा: केरळमध्ये निपाह विषाणूचा पुन्हा शिरकाव, 12 वर्षीय मुलाचा मृत्यु

पूरग्रस्तांच्या विविध मागण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या जलसमाधी आंदोलनाची यात्रा काल रात्री अब्दुललाट (ता. शिरोळ) मुक्कामी पोहोचली. त्यांनी अब्दुल लाट येथील बालोद्यानमध्ये मुक्काम केला. त्याचठिकाणी खर्डा भाकरी खीरीचा आस्वाद घेतला. आज सकाळी जलसमाधी यात्रा हेरवाड तेरवाड कुरुंदवाडहून नृसिंहवाडीला जाणार आहे.

काल सायंकाळी इचलकरंजीची सभा आटोपून शिरदवाडमार्गे शेट्टी शेकडो कार्यकर्त्यांसह शिरदवाड व नंतर अब्दुल लाट इथे पोहोचले. या मार्गावर जगोजागी महिलांनी आरती ओवाळून व औक्षण केले. हलगीचा कडकडाटात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यासह पूरग्रस्तानी जलसमाधी यात्रेचे स्वागत केले. शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील पूरग्रस्तांना शासनाने वाऱ्यावर सोडल्याने आंदोलनाची वेळ आल्याचे सांगून भरीव मदतीची मागणी केली. यावेळी भाजपचे जिल्हा परीषद पक्षप्रतोद विजय भोजे सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर सावकर मादनाईक आप्पा पाटील शितल कुरणे महावीर गिरमल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: चौकटीच्या बाहेर जात इचलकरंजीच्या दोन शिक्षकांचा हटके शिक्षण पॅटर्न

loading image
go to top