esakal | Teachers Day 2021 चौकटीच्या बाहेर जात इचलकरंजीच्या दोन शिक्षकांचा हटके शिक्षण पॅटर्न
sakal

बोलून बातमी शोधा

चौकटीच्या बाहेर जात इचलकरंजीच्या दोन शिक्षकांचा हटके शिक्षण पॅटर्न

हा अनुकरणनीय शैक्षणिक पॅटर्न राबवला जात आहे. इचलकरंजी शहरातील नगरपालिकेच्या विद्यानिकेतन या शाळेत, अन् तो पॅटर्न राबवणारे शिक्षक आहेत राजेंद्र घोडके, अलका शेलार...!

चौकटीच्या बाहेर जात इचलकरंजीच्या दोन शिक्षकांचा हटके शिक्षण पॅटर्न

sakal_logo
By
अर्चना बनगे

इचलकरंजी (कोल्हापूर): शाळेच्या पैश्‍यावर डल्ला मारणाऱ्या प्रवृत्तींच्या वाईट बातम्या अनेकदा आपल्या कानावर येत असतात. परंतु, शाळेत दिवसभर काम करून मिळणाऱ्या पगारातील मोठी रक्कम पुन्हा शाळेतील मुला-मुलींच्या उज्वल भवितव्यासाठी खर्च करणारे शिक्षणही आसपास आहेत. काळ्याकभीन्न अंधाराच्या पडद्याला जसं एखादी मिणमिणती पडती उजेडा देते, अगदी तसेच लख्ख, निराशेचे, वाईटाचे मळभ दूर करणारी अशी ही माहिती शिक्षक दिनाच्या निमित्ताने समोर आली आहे. हा अनुकरणनीय शैक्षणिक पॅटर्न राबवला जात आहे. इचलकरंजी शहरातील नगरपालिकेच्या विद्यानिकेतन या शाळेत, अन् तो पॅटर्न राबवणारे शिक्षक आहेत राजेंद्र घोडके, अलका शेलार-खोचरे...!

हेही वाचा: इचलकरंजी : गणेश मुर्ती विक्रीसाठी आठ ठिकाणी जागा निश्चीत

शिक्षकाने जर ठरवलं तर चौकटीच्या बाहेर जाऊन ते ज्ञानार्जन करू शकतात. केवळ शिक्षणच नाही तर संस्कारमय जीवन जगण्याची कला ते मुलांमध्ये घडवू शकतात. मातीला आकार देऊन कुंभार मडके घडवतो तसंच विद्यार्थ्याला केवळ अभ्यासच नाही तर संस्कारात्मक घडवून यशस्वी होण्याचे काम शिक्षकच करतो. इचलकरंजी नगरपालिकेच्या या शाळेतील तीस शिक्षकांनी चौकटीच्या बाहेर जाऊन एक शिक्षणाचा वेगळा पॅटर्न तयार केला आहे. विशेष म्हणजे या ३० शिक्षकांमध्ये २२ या महिला आहेत.

स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे काम श्री. घोडके व सौ. शेलार या करतात. घोडके हे ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा असतात त्या वर्गावर इंग्रजी, गणित, विज्ञान हे विषय घेतात तर सौ. शेलार या मराठी, हिंदी, समाजशास्त्र या विषयाचा अभ्यास मुलांचा घेतात. जे नेमकेपणाने पाहिजे तेच देण्याचा आणि त्यासाठी राज्यभर जे विविध प्रयोग राबवले जातात. त्याचाही मागोवा घेत विद्यार्थ्यांना अद्यावत ज्ञान देण्याचे काम यांच्याकडून सुरू असते.

हेही वाचा: सावधान: ‘हनी ट्रॅप’च्या विळख्यात इचलकरंजी ; 25 हून अधिक तरुण

इचलकरंजी हे कष्टकरी, मोलमजुरी करणाऱ्यांचे शहर आहे. मध्यमवर्गीय कुटुंबाची संख्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे. कुटुंबातील प्रत्येक मुलाला चांगल्या शाळेत जाऊन शिक्षण घ्यावं. हे येथील प्रत्येक कुटुंबाला परवडत नाही. मात्र इचलकरंजीतील या शाळेने शिक्षणाचा आगळा-वेगळा पॅटर्न राबवून या मुलांना शिक्षणाची कवाडे खुली केली केली आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा आहे तो घोडके आणि शेलार-खोचरे यांचा.

एका स्त्रीने ठरवलं तर ती काहीही करू शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सौ. शेलार-खोचरे. त्या शाळेच्या शिक्षकाच नाहीत तर मुलांच्या पालक म्हणून काम करतात. याच बरोबर श्री. घोडके ही हीच भूमिका बजावतात. शाळेत येऊन केवळ मुलं शिकून जावे असेच नाही तर स्पर्धेच्या माध्यमातून या मुलाने जगात टिकले पाहिजे असा शिक्षण देण्याचा ध्यास या दोघांनी घेतला. स्वतःच्या पगारातील पैसे काढून मुलांच्या शाळेच्या गरजा पूर्ण ते करत आहेत. सौ. शेलार तर आपला स्वतःचा पूर्ण पगार या मुलांसाठी खर्च करतात.

हेही वाचा: इचलकरंजी - नदीत ढकलून दिलेल्या 'त्या' बालिकेचा मृतदेह सापडला

स्कॉलरशिपच्या माध्यमातून सुरू झालेली ही शाळा इचलकरंजी शहरात अव्वल ठरत आहे. सध्या शाळेत १२०० मुलं शिक्षण घेत आहेत. NMMSपरीक्षा साठी तर ३२ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. वयात आलेल्या मुलींसाठी वेगळी काळजी घेणे त्यांना प्रशिक्षण देणे, खेळामध्ये संगीतामध्ये नृत्यामध्ये विशेष असणाऱ्या मुलांसाठी विशेष प्रशिक्षक नेमणे, एवढेच नाही तर खेळामध्ये आतापर्यंत महाराष्ट्रात सहा मुली या टीममधून खेळल्या आहेत. सध्या मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून श्वेता माईनकर ही मुलगी याच शाळेत शिकली आहे.

हेही वाचा: धोकादायक मिळकतीबाबत इचलकरंजी पालिका यंत्रणा सतर्क; प्रशासनाकडून सूचना

चंदुर, शहापूर, जय-भीम झोपडपट्टी अशा अनेक परिसरातून याठिकाणी शिकण्यासाठी मुले येतात. घरात मुलगा जन्माला आला नाही म्हणून मुलीचे नाव नकोशी ठेवायचे. अशा मुलींना जगण्याचे बळ यावे, यांची नवी ओळख निर्माण व्हावी. यासाठी शाळेमध्ये नामकरण सुद्धा केले जाते. मुलांना शिक्षणच द्यायचं नाही तर त्यांना घडवायचं हा उद्देश समोर ठेवून झगडत आहेत, या शाळेतील शिक्षक. प्रत्येक शिक्षक हा दर महिन्याला आपल्या पगारातील ३ हजार रुपये या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करत असतात.

स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी मुलांना बुद्धिमत्ता हा विषय पहिली पासून शिकवावा आता हा आमच्या पुढील उद्देश आहे.

- राजेंद्र घोडके, इचलकरंजी

loading image
go to top