
कोल्हापूर : ‘एखाद्या विकासकामासाठी मंजूर झालेल्या निधीपैकी ४९ टक्के रक्कम ही टक्केवारीत वाटप करण्यासाठी कंत्राटदाराला द्यावी लागते,’ असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमधून केला आहे. गेल्या तीन वर्षांत झालेल्या सर्वच कामांची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणीही त्यांनी या पोस्टमध्ये केली आहे.