esakal | राजू शेट्टींची जलसमाधी परिक्रमा प्रयाग चिखलीतून आजपासून सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

raju shetti

सकाळी आठ वाजता प्रयाग संगमापासून या परिक्रमेला सुरूवात होणार असून ५ सप्टेंबर रोजी नृसिंहवाडी येथे जलसमाधीने या परिक्रमेची सांगता होणार आहे.

राजू शेट्टींची जलसमाधी परिक्रमा प्रयाग चिखलीतून आजपासून सुरु

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

कोल्हापूर : पूरग्रस्तांना भरपाई देण्याबाबत केंद्र व राज्य सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी पुकारलेल्या जलसमाधी परिक्रमा (Jalasamadhi Parikrama) आंदोलनाला आज (ता. १) प्रयाग चिखली (ता. करवीर) येथून सुरुवात होत आहे.

सकाळी आठ वाजता प्रयाग संगमापासून या परिक्रमेला सुरूवात होणार असून ५ सप्टेंबर रोजी नृसिंहवाडी येथे जलसमाधीने या परिक्रमेची सांगता होणार आहे. पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारणाचे पथक आलेले नाही. या विभागाकडे हजार कोटी शिल्लक आहेत ते गुजरातला वाटण्यासाठी शिल्लक ठेवलेत आहेत काय? पूरग्रस्तांना भरपाई देण्यात दिरंगाईचा जाब विचारण्यासाठी हे आंदोलन शेट्टी यांनी पुकारले आहे.

राज्य शासनाने २०१९ च्या निर्णयानुसार भरपाई देण्याचे आदेश काढले असल्याने शेट्टी यांनी हे आंदोलन करू नये अशी विनंती पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती, पण ही विनंती धुडकावून शेट्टी आजपासून आंदोलन करत आहेत. आंबेवाडी, वडणगे, निगवे, भुये, शिये, शिरोली, हालोंडी, हेर्ले, चोकाक, रूकडी, चिंचवाड, पट्टणकोडोली, रूई, इंगळी, चंदूर, शिरदवाड, हेरवाड, तेरवाड, कुरूंदवाडमार्गे नृसिंहवाडीत जलसमाधी घेऊन आंदोलन समाप्त होणार आहे.

loading image
go to top