esakal | कोल्हापूर : दत्त मंदिरात अभिषेक घालून राजू शेट्टींची जलसमाधी परिक्रमेला सुरुवात
sakal

बोलून बातमी शोधा

raju sheeti

जलसमाधी परिक्रमा प्रयाग चिखलीतून सुरु होऊन रविवारी 5 सप्टेंबरला नृसिंहवाडी येथे सांगता होईल.

दत्त मंदिरात अभिषेक घालून शेट्टींची जलसमाधी परिक्रमेला सुरुवात

sakal_logo
By
सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पूरग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हजारो कार्यकर्त्यांसह माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti)नृसिंहवाडी येथे जलसमाधी घेणार आहेत. तत्पूर्वी प्रयाग चिखली तालुका करवीर येथे त्यांनी दत्त मंदिरात दत्ताला अभिषेक घातला. त्यानंतर ते नृसिंहवाडी येथे जाणार आहेत. शेकडो कार्यकर्त्यांनी चिखली येथे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी हजेरी लावली आहे. ही जलसमाधी परिक्रमा प्रयाग चिखलीतून सुरु होऊन रविवारी 5 सप्टेंबरला नृसिंहवाडी येथे या परिक्रमेची (Jalasamadhi Parikrama) सांगता होईल. त्यानंतर हजारो कार्यकर्त्यांसह जलसमाधी घेण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

काय आहेत प्रमुख मागण्या

-पूरग्रस्तांना 2019 प्रमाणे नुकसान भरपाई मिळावी

- आवश्यकता असलेल्या गावांचे पुनर्वसन व्हावे

- काही गावासाठी तात्पुरत्या छावण्या उभारण्यात याव्यात

- पूरग्रस्त भागातील मुलांची शैक्षणिक फी माफ व्हावी

- पडझड झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी भरघोस मदत मिळावी

- पूरग्रस्त भागातील नदीवरील पुलांची उंची तातडीने वाढवावी

loading image
go to top