Raju Shetty Demands ₹5,000 First Sugarcane Payment
esakal
यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन पाच हजार रुपये पहिली उचल मिळालीच पाहिजे. उत्पादन खर्च वाढला आहे, दुष्काळामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे. कारखानदारांनी प्रतिटन पाच हजार रुपये पहिली उचल जाहीर करावी. याचबरोबर केंद्र सरकारच्या बैठकीत निर्णय न झाल्यास महाराष्ट्र, कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावर चक्का जाम करणार असल्याचा थेट इशारा राजू शेट्टी यांनी दिली. साखर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशाराही शेट्टी यांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी(ता.10) जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेत ते बोलत होते.