बनावट नोटा कशा छापल्या? नोटा छापणारा मुख्य संशयित कोण?, या नोटा कोठे कोठे खपविल्या? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पवारच्या अटकेनंतर मिळणार आहेत.
कोल्हापूर : बॅंकेच्या डिपॉझिट मशीनमध्ये बनावट नोटा (Fake Currency Notes) भरणाऱ्या अमोल पोतदारसह त्याला नोटा पुरविणाऱ्या दोघांना जुना राजवाडा पोलिसांनी (Rajwada Police) बेड्या ठोकल्या. टोळीकडून पाचशे रुपयांच्या ८६ नोटा जप्त केल्या. याची छपाई करणारा अभिजित राजेंद्र पवार (रा. गडमुडशिंगी, मूळ रा. निपाणी) पोलिसांच्या रडारवर आहे.