Raksha Bandhan : राखीवर अवतरले अयोध्येचे श्रीराम मंदिर; भावाला दृष्ट लागू नये म्हणून 'इव्हील आय' राखी, कार्टूनचीही क्रेझ

Raksha Bandhan 2024 : यंदा राखीवर अयोध्येतील (Ayodhya Ram Mandir) नव्याने बांधलेले श्रीरामाचे मंदिर (Sri Rama Temple) अवतरले आहे.
Raksha Bandhan 2024 Rakhi
Raksha Bandhan 2024 Rakhiesakal
Updated on
Summary

रामाची धनुष्यधारी प्रतिकृती व जय श्रीराम अक्षरे असलेली राखीही ‘बहिणीं’चे लक्ष वेधून घेत आहे.

कोल्हापूर : अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या रक्षाबंधनाची (Rakshabandhan) चाहूल बाजारपेठेला लागली असून यंदा राखीवर अयोध्येतील (Ayodhya Ram Mandir) नव्याने बांधलेले श्रीरामाचे मंदिर (Sri Rama Temple) अवतरले आहे. यासोबतच रामाची धनुष्यधारी प्रतिकृती व जय श्रीराम अक्षरे असलेली राखीही ‘बहिणीं’चे लक्ष वेधून घेत आहे. सोमवारी (ता. १९) बहीण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. त्याच्या तयारीसाठी बहिणींनी राखी स्टॉलकडे पाऊले वळवली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com