esakal | Rankala Overflowing:ओसांडून वाहणारा रंकाळा पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

ओसांडून वाहणारा रंकाळा  पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची  गर्दी

ओसांडून वाहणारा रंकाळा पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची गर्दी

sakal_logo
By
- राजेंद्र पाटील

फुलेवाडी (कोल्हापूर) : गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू झाल्याने ऐतिहासिक रंकाळा तलाव (Rankala Lake) काठोकाठ भरला असून ओव्हर फ्लो झाला आहे . हरिओम नगरच्या बाजूकडील तलावाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे.मासेमारीसाठीही लोकांची गर्दी होऊ लागली आहे.रंकाळा तलाव परिसरात हरिओमनगर ते साने गुरुजी वसांहतकडील सेनापती घोरपडे चौकापर्यंत पाच मोठ्या खनी आहेत.या खणीही पाण्याने काठोकाठ भरल्या आहेत. (Rankala-Lake-overflow-kolhapur-rain-update-latest-news-akb84)

हेही वाचा: पंचगंगा नदीवरील जूना पूल पाण्याखाली: नागरिकांना सतर्कतेचा इशारा

रंकाळा परताल्यातून येणारा पाण्याचा प्रवाह रंकाळ्यात मोठ्या प्रमानात वाहत आहे. तसेच श्याम सोसायटीकडील व देशमुख हॉल जवळील नालेही तुडुंब भरून वाहू लागल्याने रंकाळ्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामूळे रंकाळ्याच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे.रंकाळयातुन पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्यावर रंकाळ्यातील पाण्याचे प्रदूषणही कमी होते व पाण्याची स्वयम् शुद्धता क्षमताही वाढते. रंकाळा सांडव्यातून पाणी वाहू लागल्यावर वाहत्या पाण्याच्या बाजूला मासेही वाहत येत असल्याने सांडव्याशेजारी मासेमारी करण्यासाठीही लोक गर्दी करत आहेत.

loading image