कर्नाटकात जायचेय? हा रिपोर्ट आवश्यकच

Covid-19-Updates
Covid-19-Updates
Updated on: 

कोगनोळी : महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कर्नाटक शासनाने महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी याठिकाणी प्रवाशांची रविवार पासून रॅपिड ॲण्टीजेन टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे .गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये महाराष्ट्र व इतर राज्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या 210 प्रवाशांची रॅपिड ॲण्टीजेन टेस्ट करण्यात आली असल्याची माहिती सौंदलगा आरोग्य सेविका अंजली रेंदाळे यांनी सांगितले. यावेळी मांगुर प्राथमिक आरोग्य केंद्र आशा कार्यकर्त्या पुष्पा भडगावे, अनिता देसाई उपस्थित होत्या.

बेळगाव जिल्हा लगत असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत असल्याने कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. या ठिकाणाहून आजरा, चंदगड, उत्तूर, गडिंग्लज याठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचे ओळखपत्र बघून सोडण्यात येत आहे. तर कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांचे आरटीपीसीआर रिपोर्ट किंवा कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचा दाखला बघून त्यांना कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये चाचणी केलेल्या प्रवाशांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास निपाणी येथील महात्मा गांधी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.या ठिकाणी तपासणी करण्यात आलेल्या दोनशे दहा पैकी एक ही प्रवासी पॉझिटिव्ह आला नाही.

रविवारी दिवसभरात 40 प्रवाशांची रॅपिड ॲण्टीजेन टेस्ट करण्यात आली. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने त्यांना कर्नाटक राज्यात प्रवेश देण्यात आला. या सीमा तपासणी नाक्यावर तालुका आरोग्य अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांकडून रॅपिड ॲण्टीजेन टेस्ट करण्यात येत आहे. तर निपाणी मंडळ पोलीस निरीक्षक शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय बी एस तळवार व अन्य पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com