
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरात मुसळधार पावसामुळे राऊतवाडी धबधबा ओसंडून वाहत आहे. पर्यटकांचा ओघ वाढत असतानाच, येथे घडलेल्या एका थरारक घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. राऊतवाडी धबधब्यावर सेल्फी काढण्याच्या नादात एका तरुणाचा पाय घसरला आणि तो पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला. मात्र, इतर पर्यटकांच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव थोडक्यात वाचला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, प्रशासनाने पर्यटकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.