esakal | चांगल्या पद्धतीने घरीच कच्चे केळी पिकवू शकता;जाणून घ्या त्याविषयी

बोलून बातमी शोधा

चांगल्या पद्धतीने घरीच कच्चे केळी पिकवू शकता; जाणून घ्या त्याविषयी
चांगल्या पद्धतीने घरीच कच्चे केळी पिकवू शकता; जाणून घ्या त्याविषयी
sakal_logo
By
गणेश पिटेकर

आपण जी केळी खातो, ती रसायन किंवा नैसर्गिक पद्धतीने पिकवले आहे? हा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? जर पडला तरी त्याचे बहुतेक उत्तर रसायन असेच असेल. याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे आपणच कच्चे केळी पिकवली पाहिजे. तर चला जाणून घ्या घरच्या घरी दोन दिवसांत कच्ची केळी पिकवायची..

गवताचा करा उपयोग

- घासाच्या मदतीने तुम्ही सहज एक ते दोन दिवसांत कच्ची केळी पिकवू शकता. त्यासाठी गार्डनमध्ये असलेले गवत कापून उन्हात ठेवा. ते सुकल्यानंतर ते एका कागदावर ठेवून द्या. त्यात कच्ची केळी ठेवून थंड ठिकाणी ठेवून द्या. दोन ते तीन दिवसांत कच्ची केळी पिकून तयार होईल.

पेपर बॅगचा करा वापर

- जर तुम्हाला केळी लवकर पिकवायची असेल तर पेपर बॅगचाही वापरु शकता. केळीत एथेन गॅस असते. तिच्या मदतीने केळी पेपरमध्ये ठेवल्याने ती पिकतात. यासाठी सर्वप्रथम केळीला कोणत्यातरी पेपरमध्ये चांगल्या प्रकारे गुंडाळून घ्या. आता ती पेपर बॅगमध्ये टाकून किचनमध्ये ठेवून द्या. एक ते दोन दिवसांत नैसर्गिक पद्धतीने केळी पिकून तयार होतात.

तांदळाच्या डब्यात ठेवा

- केळीला नैसर्गिक पद्धतीने पिकवण्यासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे तांदूळ. यासाठी केळीचा वरचा भाग प्लास्टिकने गुंडाळा. त्यानंतर पेपर बॅग किंवा न्यूज पेपरमध्ये ठेवा आणि तांदळात ती ठेवून द्या. साधारण एक ते दोन दिवसांत कच्ची केळी पिकवून तयार होते.

मातीचा वापर करा

- आजही दूरच्या आणि ग्रामीण भागात कच्ची केळी मातीच्या आत ठेवून ती पिकवली जाते. त्यासाठी सर्वप्रथम केळीला कोणत्याही कपड्यात किंवा पेपरमध्ये गुंडाळून मातीत जवळजवळ २ ते ३ तीन खोल दाबली जातात आणि वरुन केळीला मातीने झाकले जाते. याने दोन दिवसांत केली सहज पिकते. मातीत पिकवलेले केळी स्वादिष्ठ आणि आरोग्यही असते.

Edited By- Archana Banage