
साताऱ्यात रेड अलर्ट; सांगलीत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा आदेश
सांगली: कोल्हापूर,सांगली,सातारा (Satara) जिल्ह्यात हवामान खात्याने रेड अलर्ट (Red alert) जाहिर केला आहे. या पार्श्वभूमिवर कोयना धरणातून (Koyna Dam) सकाळी अकरा वाजल्यापासून १७ हजार क्युसेक्सने विसर्ग वाढवून तो ४९ हजार ३४४ क्युसेक्स करण्यात आला आहे. गेली पाच दिवस धरणातून ३३ हजार क्युसेक्सने पाणी सुरु होता. सांगलीत आयर्विनवर पाणीपातळी ४०.२ फुटांपर्यत कमी झाली आहे. साधारण एक दिवसानंतर हे पाणी सांगलीत येणार आहे. यामुळे पुन्हा सांगलीतील उपनगरातील लोकांनी धास्ती घेतली आहे. यामुळे पाटबंधारे विभागाने पुन्हा एकदा नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.(Red-Alert-in-Kolhapur-Sangli-Satara-Koyna-Dam-Water-released-on-50-thousand-orders-to-riverside-villages-flood--akb84)
गेली दोन दिवस कोयना, वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओरसला होता. नद्यांची पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. पाणी नदीपात्रात गेले आहे. सांगली शहरातील बाजारपेठ सुरु झाली असून घरातील पाणी कमी झाल्याने स्थलांतरित लोक घराकडे परतू लागली आहेत. सांगली शहरासह ग्रामीण भागात स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. महापूर आणि अतिवृष्टी झालेल्या सर्कलमध्ये महसूल पंचनामे सुरु झाले आहेत.