Kolhapur : 'या' नामांकित हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात? अहवाल देण्यास 'सीपीआर'कडून टाळाटाळ

श्री हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात होत असल्‍याच्या संशयावरून महापालिका आरोग्य विभागाने १२ जूनला छापा टाकला होता.
Avoid Pregnancy
Avoid Pregnancyesakal
Summary

सीपीआर प्रशासनाकडून महापालिका आरोग्य विभागाला मिळणारा अहवाल महत्त्‍वाचा आहे.

कोल्हापूर : राजारामपुरीतील श्री हॉस्पिटलमध्ये (Shree Hospital Rajarampuri) संशयित अर्धवट गर्भपात झाल्याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत होऊनही अद्याप सीपीआर (CPR Hospital) प्रशासनाकडून महापालिका आरोग्य विभागाला त्याचा अहवाल दिला गेला नाही.

घटनेला चार दिवस होऊनही ‘सीपीआर’कडून अहवाल देण्यास टाळाटाळ होत आहे. दरम्यान, राजारामपुरी बसरुट वरील डॉ. सोनल वालावलकर यांच्या श्री हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात होत असल्‍याच्या संशयावरून महापालिका आरोग्य विभागाने १२ जूनला छापा टाकला होता. त्यानंतर त्याची कागदपत्रे तपासणीसह जाबजबाब सुरू झाले आहे.

Avoid Pregnancy
ED Inquiry : NCP आमदार हसन मुश्रीफांसह त्यांच्या मुलासमोरील अडचणी वाढल्या; कोर्टानं दिला 'हा' आदेश

केवळ गर्भलिंग होत असल्याच्या संशयावरून हा छापा टाकला होता. मात्र, त्या ठिकाणी गर्भपात झाल्याचा संशय आल्यामुळे संबंधित महिलेला तेथून सीपीआरमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले होते. त्या महिलेचा संशयित अर्धवट गर्भपात झाल्याचे दिसले आहे. त्याची नोंद काल सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

Avoid Pregnancy
धक्कादायक! 'या' नामांकित हॉस्पिटलमध्ये महिलेचा अर्धवट गर्भपात? आरोग्याधिकाऱ्यांचा छापा

त्यामुळे सीपीआर प्रशासनाकडून महापालिका आरोग्य विभागाला मिळणारा अहवाल महत्त्‍वाचा आहे. काल सायंकाळपर्यंत हा अहवाल सीपीआर प्रशासनाकडून मिळालेला नसल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागातील डॉ. रती अभिवंत यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com