वैयक्तिक कामास नकार पडला दोघांना महाग

 Refusing personal work cost both
Refusing personal work cost both
Updated on

आजरा ः आजरा नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यांनी सांगितलेला अर्ज टायपिंग करून दिला नसल्याच्या कारणावरून संबंधित नगरसेवक व दोन कर्मचाऱ्यांत जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. संतप्त नगरसेवकांनी दोन कर्मचाऱ्यांना खोलीत कोंडून ठेवल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत दिवसभर काम बंद आंदोलन केले. याबाबतचे निवेदन कर्मचारी संघटनेने मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.

नगरपंचायत हद्द सर्वेक्षणावेळी शहरालगतचा काही भागाचा समावेश करण्याच्या सूचना केलेल्या असतानाही संबंधित भाग वगळण्यात आला. या प्रकरणावरून गेले काही दिवस संबंधित नगरसेवकांकडून वारंवार चर्चा केली जात होती. या अनुषंगाने भूमी अभिलेख कार्यालयात देण्यासाठी अर्ज टायपिंग करून देण्यावरून वाद झाला. कर्मचारी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, स्वीकृत सदस्यांनी दूरध्वनी करून वैयक्तिक कामासाठी भूमिअभिलेख कार्यालयातून माहिती मागवण्यासाठी अर्ज टायपिंग करण्यास सांगितला होता. हे काम केले नाही म्हणून नगरपंचायतीचे मुख्य लिपिक व त्यांच्या सहकाऱ्यास संबंधित सदस्यांनी कार्यालयाच्या मिळकत विभागाच्या खोलीत वाद घालत दोघांना कोंडून घातले. कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. कोरोनात दिवसरात्र काम करून कुटुंबाची पर्वा न करता शहराला सुरक्षित ठेवण्याचे काम कर्मचारी करीत असतानादेखील कर्मचाऱ्यांना चुकीची वागणूक मिळत आहे. त्या सदस्यांनी माफी मागावी अन्यथा काम बंद आंदोलन चालू राहील असा इशारा कर्मचारी संघटनेने दिला आहे. 
दरम्यान, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी वाद मिटवून प्रकणावर पडदा पाडण्यासाठी प्रयत्न केले; परंतु संबंधित नगरसेवक बाहेर गावी गेल्याने कर्मचारी व त्यांच्यात चर्चा झाली नसल्याचे समजते. संबंधित नगरसेवकांना याबाबत संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com