esakal | ...अखेर ताम्रपर्णी नदीत पाणी सोडले

बोलून बातमी शोधा

Released Water Into The Tamraparni River Kolhapur Marathi News

कोवाड येथील ताम्रपर्णी नदीवरील कोवाड ते दुंडगे पर्यंतच्या उघड्या पडलेल्या नदीपात्रात पाटबंधारे विभागाने बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामामुळे अडविलेले पाणी आज सोडल्याने नदीपात्र पाण्याने भरले.

...अखेर ताम्रपर्णी नदीत पाणी सोडले

sakal_logo
By
अशोक पाटील

कोवाड : येथील ताम्रपर्णी नदीवरील कोवाड ते दुंडगे पर्यंतच्या उघड्या पडलेल्या नदीपात्रात पाटबंधारे विभागाने बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामामुळे अडविलेले पाणी आज सोडल्याने नदीपात्र पाण्याने भरले. पाणी आल्याने आज पुन्हा कृषी पंप सुरू झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. 

गेल्या पंधरा दिवसापासून कोवाड बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. बंधाऱ्याच्या पायाखुदाईचे काम सुरू असल्याने बंधाऱ्याच्या वरील भागात मातीचा कट्टा घालून पाणी अडविले होते. त्यामुळे बंधाऱ्याच्या खालच्या नदीपात्रातील पाणी बंद झाल्याने नदीपात्र उघडे पडले होते. सध्या पिकांना पाण्याची गरज असल्याने शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची मागणी होती.

याबाबत दै. "सकाळ'मधून बुधवारच्या अंकात "कोवाड ते कालकुंद्री पर्यंतचे नदीपात्र कोरडे' या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द केली होती. पाटबंधारे विभागाने तात्काळ याची दखल घेऊन आज दुपारी बंधाऱ्याच्या एका बाजूच्या कमानीतून अडविलेले नदीतील पाणी सोडले. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. नदीकाठावरील उघडे पडलेले कृषी पंप आज पुन्हा सुरू झाले. पावसाळा जवळ येत असल्याने बांधाऱ्याच्या दुरुस्तीचे कामही गतीने सुरू आहे.

कामात अडथळा न येता पाणी पुरवठा कसा करता येईल, याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केल्याचे समजते. उघडे पडलेले नदीपात्र भरल्यानंतर पुन्हा पाणी थांबवून काम सुरु केले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही सहकार्य करावे,असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur