esakal | कोरोना रुग्णांना दिलासा ः ऑक्‍सिजनचा पुरवठा वाढणार, पुण्यातून दिवसाला दोन टॅंकर येणार
sakal

बोलून बातमी शोधा

Relief to Corona patients: Oxygen supply will increase, two tankers a day will arrive from Pune

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी ऑक्‍सिजनाचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी "सीपीआर'मध्ये 20 हजार लिटरचा टॅंक उभारला आहे. तरीही, पुण्याहून रोज दोन टॅंक्‍टर ऑक्‍सिजन कोल्हापूरमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे ऑक्‍सिजनअभावी रुग्णांचे उपचार थांबले, असे होणार नसल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. 

कोरोना रुग्णांना दिलासा ः ऑक्‍सिजनचा पुरवठा वाढणार, पुण्यातून दिवसाला दोन टॅंकर येणार

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी ऑक्‍सिजनाचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी "सीपीआर'मध्ये 20 हजार लिटरचा टॅंक उभारला आहे. तरीही, पुण्याहून रोज दोन टॅंक्‍टर ऑक्‍सिजन कोल्हापूरमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे ऑक्‍सिजनअभावी रुग्णांचे उपचार थांबले, असे होणार नसल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. 
श्री. पाटील म्हणाले, ""जिल्ह्यात कोरोना रुग्णांना ऑक्‍सिजनची कमतरता भासू नये, यासाठी पुरेशी काळजी घेतली जात आहे. 20 हजार लिटरचा टॅंक उभारण्यात आला. दरम्यान, पुण्याहून रोज दोन टॅंकर ऑक्‍सिजन कोल्हापुरात आणण्याचा प्रयत्न आहे. याचे नियोजनही केले जाईल. त्यामुळे कोल्हापूरमध्ये उत्पादित होणारा ऑक्‍सिजन खासगी रुग्णालयांसाठी आणि पुण्याहून कोल्हापुरात येणारा ऑक्‍सिजन सीपीआर रुग्णालयासाठी एकमार्गी देता यावा, यासाठी नियोजन केले जात आहे. यामुळे ऑक्‍सिजन मिळाला नाही म्हणून कोणताही रुग्ण दगावू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. "सीपीआर'मधील 20 हजार लिटर ऑक्‍सिजनचा टॅंक दिलासादायक असून, यामुळे रुग्णांना तत्काळ ऑक्‍सिजन उपलब्ध होणार आहे. 

बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतेय 
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण जरी वाढत असले तरीही बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे, आता लोकांनी अजून दक्षता आणि काळजी घेतली पाहिजे. पण, घाबरून जाऊ नये, असेही आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे. विलगीकरण केंद्रात लोकांना सर्व सुविधा दिल्या जात आहेत. त्यांना वेळीच आवश्‍यक औषधे, जेवण, नाश्‍ता किंवा इतर सुविधा दिल्या जातात. काही ठिकाणी तक्रारी आहेत, त्या ठिकाणी लोकांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. 

संपादन - यशवंत केसरकर
 

loading image
go to top