esakal | कोरोना बाधीतांना दिलासादायक ः लक्षणे नसलेले रुग्ण लवकर बरे
sakal

बोलून बातमी शोधा

Relieving corona infections: Asymptomatic patients recover faster

जिल्ह्यात कोरोनाचा वाढत्या रुग्णांमुळे लोकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. वास्तविक आता जे रुग्ण आढळतात. त्यापैकी 90 टक्के रुग्णांना कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत.

कोरोना बाधीतांना दिलासादायक ः लक्षणे नसलेले रुग्ण लवकर बरे

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसें-दिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. दिवसाला 500 ते 600 कोरोना बाधित रुग्ण आढळत आहे. मात्र, प्रत्येक दिवशी आढळणारे रुग्णांमधील 90 टक्के रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, त्यामुळे जरी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असला तरी असे रुग्ण काही दिवसातच बरे होत आहेत. तसेच, इतर कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे, ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. 
जिल्ह्यात कोरोनाचा वाढत्या रुग्णांमुळे लोकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. वास्तविक आता जे रुग्ण आढळतात. त्यापैकी 90 टक्के रुग्णांना कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना होतो. संपर्कात आलेल्यांची तपासणी केल्यानंतर कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून येत आहे. याउलट कांही कोरोना बाधितांच्या घरात 10 ते 15 सदस्य असतानाही केवळ एक दोघांनाच लागण झाल्याची उदाहरणे आहेत. ज्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पण त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, अशांची संख्या जास्त आहे. त्यांनी वेळीच उपचार घेतले तर ते लवकर पूर्णपणे बरे होवू शकतात, असे चित्र आहे. तर 14 ऑगस्टपासून बरे होणाऱ्या कोरोना बाधितांची संख्याही वाढली आहे. 10 ते 13 ऑगस्ट अखेर सरासरी 150 ते 175 रुग्ण बरे झाले आहेत. मात्र 14 ऑगस्टपासून पूर्णपणे बरे होवून घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या 400 ते 600 हून अधिक झाली आहे. त्यामुळे येथून पुढेही काळजी घेत, उपचार घेणे गरजेचे आहे. 


जिल्ह्यात आढळणाऱ्या कोरोना रुग्णांपैकी 90 टक्के रुग्णांना तीव्र लक्षणे दिसत नाही. त्यामुळे अशा रुग्णांनी घाबरून न जाता, योग्य औषधे व आहार घेतल्यास बरे होतात मात्र सर्वांनीच हात धुणे, मास्क लावणे ही पथ्ये पाळली तर दुसऱ्यांनाही सुरक्षित ठेऊ शकतो. 
- डॉ. योगेश साळी, जिल्हा आरोग्य अधिकारी 

 

संपादन - यशवंत केसरकर

loading image
go to top