esakal | कोरोनाची लक्षणं दिसताहेत? मग, रेमडेसिव्हिर घ्या 12 दिवसांच्या आतच!
sakal

बोलून बातमी शोधा

remdesivir

रेमडेसिव्हिरचा उपयोग 'त्या' 12 दिवसांच्या आतच!

sakal_logo
By
शिवाजी यादव ः

कोल्हापूर: रेमडेसिव्हिर मुळे कोरोना शंभर टक्के बरा होत नाही पण कोरोनाची तीव्रता कमी करण्यास रेमडेसिव्हिरचा उपयोग निश्‍चित होतो. मात्र रेमडेसिव्हिर हे कोरोना लक्षण दिसल्यापासून 9 ते 12 दिवसांच्या आतच घ्यावे लागते. त्यानंतर दिलेल्या रेमडेसिव्हिरचा वापर हा अनावश्‍यकच ठरतो. अशा स्थितीत रेमडेसिव्हिरची गरज नेमकी कोणत्या रूग्णाला आहे ही बाब समजून घेणे आवश्‍यक आहे असे मत सीपीआर रूग्णालयाचे हृदयविकार तज्ञ डॉ. अक्षय बाफना यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.

सीपीआर रूग्णालयात कोरोनाच्या अती गंभीर रूग्णांवर उपचार सेवा देताना गेल्या वर्षभरात ज्या रूग्णांना रेमडेसिव्हिर दिले, त्यांच्या प्रकृतीची निरिक्षणे नोंदविली आहेत, त्यानुसार डॉ. बाफना यांनी रेमडेसिव्हिरच्या वापराबाबत दिलेली माहिती :

सरसकट गंभीर कोरोनाबाधित रूग्णांनारेमडेसिव्हिरची गरज नाही. असे शासकीय डॉक्‍टर कळकळीने सांगत आहेत मात्र काहीजण चक्क घरी उपचार घेणाऱ्या बाधिताला रेमडेसिव्हिरची लस द्या असा आग्रह धरतात, ही बाब गंभीर आहे. यापार्श्‍वभूमीवर रेमडेसिव्हिरची गरज नेमकी कोणत्या रूग्णाला आहे समजून घेणे आवश्‍यक ठरते.

कोरोनाबाधितांची प्रकृती लक्षणे, ओळखून अचूक वेळी योग्य त्या तज्ञांनी, सुयोग्य ठिकाणी (हॉस्पीटल मध्येच) रेमडेसिव्हिरच दिल्यास त्याचा नक्की सकारात्मक उपयोग होतो. असेही डॉ. बाफना यांनी सांगितले.

रेमडेसिव्हिर म्हणजे काय : जंतू संसर्ग 2 पासून 4, 4 पासून 8 व 8 पासून 16 असा जंतूसंसर्ग पसरण्याची (रिप्लेकेशन) तीव्रता कमी करणारी (लस इंजेक्‍शन)

रेमडेसिव्हिरची देण्याची पध्दत : पहिल्या दिवशी दोन डोस देतात, त्यानंतर 2 ते 5 दिवसांच्या मध्ये एकूण सहा डोस घ्यावे लागतात.

रेमडेसिव्हिर हे हॉस्पीटलमध्येच व तज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे लागते.

कोणत्याही परस्थितीतरेमडेसिव्हिर घरी घेऊ नये.

हेही वाचा- Good News : क्‍यू आर कोड रोखणार हापूसमधील भेसळ

रेमडेसिव्हिर फक्त याच रूग्णांना देण्याची गरज

रूग्णांची ऑक्‍सिजन पातळी खोली मध्ये 93 टक्‍क्‍यां पेक्षा कमी आहे, ज्या रूग्णाला ऑक्‍सिजनवर ठेवले आहे. ज्याचा एचआरसीटीचा स्कोअर 25 पैकी 10 च्यावर आहे. व 40 पैकी 16 पेक्षा जास्त आहे. रूग्णांचा ताप नियमितपणे 100 पॅरेनाईटच्या ( 38.3 डिग्रीसेल्सियच्यावर ) आहे. सलग तीन दिवस ताप आहे.

या रूग्णांचे गांभिर्य ओळखून रेमडीसवियर द्यावे

ज्या कोरोनाबाधिताला कर्करोग आहे, कर्करोगांची औषधे सुरू आहेत, फुप्फुसाचा गंभीर आजार आहे, हृदयाचा आजार आहे अशाना गांभिर्य ओळखून देता येईल.

या रूग्णांसाठी रेमडेसिव्हिर वापरणे गैर

ज्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत, अन्य आजारांची कोणतीच लक्षणे नाहीत. ऑक्‍सिजनची पातळी ज्यांची 95 टक्‍क्‍यांच्यावर आहे.

अतिगंभीर अवस्थेतील रूग्ण.

किडणी किंवा लिव्हर फेल झालेले रूग्ण.

ज्या रूग्णांचा कोरोना 12 दिवसापेक्षा जास्त आहे.

गरोदर महिलांनाही रेमडेसिव्हिर देण्याबाबत अभ्यास पुढे आलेला नाही त्यामुळे गरोदर महिलांना हे इंजेक्‍शन देणे शक्‍यतो टाळले जाते.

Edited By- Archana Banage