बरं झालं... इचलकरंजीतील त्या घरातील इतरांचा रिपोर्ट आला निगेटिव्ह...

Reports of swabs of three members of the in ichalkaranji family came negative today
Reports of swabs of three members of the in ichalkaranji family came negative today
Updated on

इचलकरंजी - एकाच कुटूंबातील दोघांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हादरलेल्या इचलकरंजीकरांना आज मोठा दिलासा मिळाला. कोले मळ्यातील बाधीत वृध्दाच्या कुटूंबातील तिघांच्या स्वॅबचे अहवाल आज निगेटिव्ह आले. यामध्ये बाधीत वृध्दाच्या पत्नी, मुलगा व सूनेचा समावेश आहे. याबाबतची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

कोले मळ्यातील एका साठ वर्षीय वृध्दाला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे वस्त्रनगरीत मोठी खळबळ उडाली होती. प्रशासनही धास्तावले होते. त्यातच काल रात्री बाधीत वृध्दाच्या चार वर्षीय नातवाला कोरोनाची लागण झाल्याने शहरात चिंतेचा विषय बनला होता. बाधीत वृध्दाच्या पत्नीला खोकला वाढल्याने तिच्या अहवालाकडे प्रशासनाचे लक्ष लागले होते. पण आज बाधीत वृध्दाच्या पत्नीसह मुलगा, सून यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे सर्वानाच दिलासा मिळाला आहे. बाधीत वृध्दावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होत  असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
दरम्यान, सांगली कनेक्शन असलेल्या व इचलकरंजीत राहत असलेल्या बँक अधिकारी व त्यांच्या पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे दत्त कॉलनी परिसरातील नागरीकांना दिलासा मिळाला आहेे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com