परतीच्या पावसाचा झेंडूला फटका ; किरकोळ विक्री 120 रूपये किलो 

The return rain hit the marigold; Retail sale Rs. 120 per kg
The return rain hit the marigold; Retail sale Rs. 120 per kg
Updated on

कोल्हापूर  : परतीच्या पावसामुळे झेंडूला फटका बसला आहे किरकोळ बाजारात फुलांचे 120 ते 150 प्रति किलो असे आहेत. दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने दर थोडा वधारला आहे अन्यथा कवडीमोल भावाने फूले विकण्याची वेळ शेतकरी तसेच व्यापाऱ्यांवर आली असती. घाऊक मार्केटमध्ये प्रतिकिलो दर 40 ते 50 रूपये किलो आहे. दरवर्षी दसरा डोळ्यासमोर ठेऊन फुलांची लागवड केली जाते. साधारणतः 50 ते 55 व्या दिवशी फूल लागण्यास सुरवात होते. तीन महिन्यात फुलांची बाग बहरून येते. 
दरम्यान यंदा दसऱ्याच्या पहिल्या माळेला झेंडूच्या फुलांचा भाव प्रतिकिलो 100 रूपये होता. तिसऱ्या माळेपर्यंत भाव स्थिर राहिल्याने किमान उत्पादन खर्च तरी बाहेर पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र चार दिवसापासून सायंकाळी पाऊस ज्या पद्धतीने हजेरी लावत आहे ते पाहता झेंडूच्या मार्केटचे गणित कोलमडू लागले आहे.. दसऱ्याला सजावटीसाठी तसेच खंडेनवमीच्या पूजेला फुलांचा वापर होतो. जिल्ह्यात राशिवडे, महे तसेच गणेशवाडी येथे प्रामुख्याने फुलांचे पीक घेतले जाते. कोरोना पर्यायाने लॉकडाऊन यामुळे मंदीरे बंद आहेत. फूल व्यापाऱ्यांचे अर्थकारण मंदिरात येणाऱ्या भाविकांवर अवलंबून आहे. अन्य फुलांना, पुष्पहारांना मार्केट नाही. अशा स्थितीत घाऊक फूल विक्रेते तसेच शेतकऱ्यांना झेंडू विक्रीपासून चार पैसे मिळतील अशी आशा होती. 

लॉकडाऊनमुळे मंदिरे बंद आहेत,यामुळे फूल विक्रेत्यांचे अर्थकारण बिघडले आहे.त्यात पावसाने झेंडूच्या दराला फटका बसला आहे. पावसामुळे फूलात पाणी साचून राहिले आहे. माल फार काळ टिकू शकत नाही त्यामुळे मिळेल त्या दराला फुले विकण्याची वेळ आली आहे. 
- विक्रम जरग, जेष्ठ, फूल व्यावसायिक 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com