
इचलकरंजी : विषारी द्रव प्यायल्याने विवाहितेचा आज उपचारदरम्यान सांगली सिव्हिल रुग्णालयात मृत्यू झाला. राखी संपत शिकलगार (वय ४१, रा. वेताळपेठ परिसर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, पत्नीच्या मृत्यूमुळे असहाय्य आणि निराधार वाटत असलेल्या संपत यांनी कृष्णा नदीच्या अंकली पुलावरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे असलेल्या लोकांनी त्याचे प्राण वाचवले. याबाबत सांगली पोलिस ठाण्यात दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.