सख्या बहिणींची राष्ट्रीय कुस्तीत दंगल

दि न्यू हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेजमधील दोन सख्या बहिणींनी राष्ट्रीय रँकिंग कुस्ती स्पर्धा गाजवली
national wrestling Two sisters
national wrestling Two sisterssakal

इचलकरंजी : दोन सख्या बहिणींचा प्रवास जास्तीत घर आणि शाळेपर्यत.मात्र येथील दि न्यू हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेजमधील दोन सख्या बहिणींनी राष्ट्रीय रँकिंग कुस्ती स्पर्धा गाजवली.दोन्ही बहिणी राष्ट्रीय रँकिंगमध्ये पाचव्या क्रमांकाने यशस्वी झाल्या.समीक्षा भोईंबर आणि समृद्धी भोईंबर या दोन बहिणींच्या खेळाने बिहार राज्यातील पाटणा येथील पाटलीपुत्र स्टेडियम अवाक झाले. दोघींच्या यशाने हरियाणा, पंजाब सारख्या राज्यांची मक्तेदारी मोडत पहिल्या 10 रँकमध्ये महाराष्ट्राने स्थान पटकावले.एका यंत्रमाग कामगाराच्या मुलींनी राष्ट्रीय कुस्तीत केलेली ही दंगल कुस्तीच्या उज्वल भविष्यासाठी आदर्श ठरली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या कुस्ती परंपरेला मोठे स्थान आहे.छत्रपती शाहू महाराजांपासून मिळालेले कुस्तीला मिळालेले बळ आजही टिकून आहे. गेल्या काही वर्षांपासून याच कुस्तीत मुलीही दिसू लागल्या आहेत आणि त्याच ताकदीने त्या स्पर्धाही जिंकत आहेत. येथील दि न्यू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता समीक्षा भोईंबर ही इयत्ता सहावीमध्ये आणि समृद्धी भोईंबरही इयत्ता नववीमध्ये शिकत आहेत. या दोन्ही सख्ख्या बहिणी असून दोघींना कुस्तीची प्रचंड आवड आहे. वडील विजयकुमार भोईंबर हे यंत्रमाग कामगार आहेत.दोघींना घरातून कोणताही कुस्तीचा वारसा नाही. मात्र कुस्ती खेळण्याची प्रचंड जिद्द या सख्ख्या बहिणींमध्ये लहानपणापासूनच आहे. अनेक शालेय स्पर्धा गाजवत या मुलींनी आपले कुस्तीत कौशल्य चांगले जपले. सरावात सातत्य ठेवत दोघींनी कुस्ती मनापासून जपली.बिहार पाटणा येथील पाटलीपुत्र स्टेडियममध्ये झालेल्या राष्ट्रीय रँकिंग स्पर्धेत या दोघी बहिणींचा खेळ वाखाणण्याजोगा ठरला. दोघी बहिणींनी महाराष्ट्राला पाचवी रँक मिळवून दिली. समीक्षाने 36 किलो वजनी वयोगटात तर समृद्धीने 33 किलो वजनी गटात ही रँक खेचून आणली.

मुली असताना या या सख्या बहिणींनी मुलांसारकाही कर्तबगारी दाखवत कुस्तीत आपले प्रदर्शन दाखवून दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी सारख्या शहरातून थेट राष्ट्रीय रँकिंग स्पर्धेत त्यांनी मिळवलेले हे यश कुस्ती जगताला अभिमानास्पद असे आहे. शाळेतसुद्धा कुस्ती खेळण्यासाठी भौतिक सुविधा उपलब्ध नाहीत. घरची परिस्थिती अत्यंत आर्थिक बेताची आहे. अशा कठीण परिस्थितीत मुलगी असताना कुस्तीसारख्या खेळात नावीन्य आणि कौशल्य पणाला लावत दोघी बहिणीनीं यश खेचून आणले आहे. त्यांच्यामुळे महाराष्ट्राला या दोन वजनी गटात पाचवी रँक प्राप्त झाली. आता या दोन्ही सख्ख्या बहिणी खेलो इंडिया स्पर्धेत दिसणार आहेत.त्यांना मुख्याध्यापक एस.ए.पाटील,क्रीडाशिक्षक प्रकाश कोळी आदींचे मार्गदर्शन लाभले.

ऑलिंपिक पंचाचे वेधले लक्ष

दोन्ही बहिणींचा खेळ पाहून भारताकडून ऑलिंपिक स्पर्धेसाठी पंच म्हणून काम करणारे एकमेव पंच हरियाणा राज्याचे अशोक कुमार थक्क झाले.तसेच ओलंपिक पदक विजेती साक्षी मलिक यांचे राष्ट्रीय प्रशिक्षक शाम बुडकी यांनीही कौतुकाची थाप मारली.खेळानंतर दोघींच्या भविष्याबाबत सल्ला देत त्यांच्या कुस्तीला सलाम केला.यानिमित्ताने या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत दोन्ही बहिणींचे भारतीय कुस्तीतील भविष्य अधोरेखित झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com