ऋषी कपूर अन् कोल्हापुरचं अनोख नातं... पन्हाळा, मसाई परिसरात चित्रीकरणासाठी असायचा आग्रह...

Rishi Kapoors and all kapoors family unique relationship with Kolhapur city
Rishi Kapoors and all kapoors family unique relationship with Kolhapur city
Updated on

कोल्हापूर - भारतीय सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या कपूर घराण्यावर कोल्हापूरकरांनी आणि कपूर घराण्याने कोल्हापूरवर नेहमीच भरभरून प्रेम केले. म्हणूनच 1996 साली 'प्रेम ग्रंथ' या चित्रपटाची निर्मिती करताना येथील पन्हाळा, मसाई परिसरात चित्रीकरणाचा आग्रह कपूर घराण्यातील सदस्यांनी धरला होता आणि त्यानुसार येथे चित्रीकरणही पूर्ण झाले... बॉलीवूडचे चॉकलेट हिरो म्हणून प्रदीर्घ काळ चित्रपट रसिकांच्या मनाला भुरळ घालणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आज निधन झाले आणि त्यांच्या व एकूणच कपूर घराण्याविषयीच्या कोल्हापुरातील आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. दरम्यान, 1978 ला प्रदर्शित झालेल्या 'फुल खिले है गुलशन गुलशन' या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्तानेही ऋषी कपूर कोल्हापुरात आले होते.

आर. के. स्टुडिओ...

ग्रेट शोमन राज कपूर यांनी चेहऱ्याला पहिल्यांदा रंग लावला तो 'वाल्मीकी' या चित्रपटात. येथील जयप्रभा स्टुडिओत या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. या चित्रपटातील नारद मुनींची भूमिका चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी राज कपूर यांना दिली होती. त्यापोटी मिळालेल्या पाच हजार रुपयांच्या मानधनातून त्यांनी आर. के. स्टुडिओसाठी चेंबूर येथे जागा खरेदी केली आणि त्यानंतर हा स्टुडिओ भारतीय सिनसृष्टीतील एक सुवर्ण पान ठरला. ऋषी कपूर यांच्या एकूणच कारकिर्दीत याच स्टुडिओचे योगदान मोठे राहिले.

नाते तीन पिढ्यांचे...!

मुळात चाळीसच्या दशकात पृथ्वीराज कपूर यांचा मुक्कामच सहकुटुंब कोल्हापुरात होता. 'वाल्मीकी', 'महारथी कर्ण' आदी चित्रपटांची निर्मिती भालजींनी या काळात केली होती. त्यावेळी लहान असणाऱ्या राज कपूर यांच्यासह शशी कपूर यांचा तीन चाकी सायकल चालवण्यापासून ते रंकाळ्यावर फिरायला जाण्यापर्यंतचा सारा प्रवास आजही येथील काही ज्येष्ठांच्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा तरळतो. कोल्हापूर महापालिकेत शिपाई म्हणून काम करणारे (कै.) संभाजी पाटील राज कपूर यांचे चाहते. त्यांनीच पुढाकार घेऊन वाशी नाका येथे राज कपूर यांचा पुतळा उभारला असून, आजही पाटील कुटुंबीय व राज कपूर यांचे चाहते या पुतळ्याची देखभाल करतात. या पुतळ्याच्या अनावरमासाठी शशी कपूर स्वतः आले होते. पृथ्वीराज कपूर त्यानंतर राज व शशी कपूर आणि त्यानंतर ऋषी कपूर अशा एकूणच कपूर घराण्यातील तीन पिढ्यांनी कोल्हापूरशी नेहमीच प्रेमाचे नाते जपले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com