
Red Handed Caught Bribe : माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीआधारे तक्रारीची भीती घालून २० लाखांची खंडणी मागून त्यापैकी १५ लाख रुपये घेताना माहिती अधिकार कार्यकर्ता (आरटीआय) जयराज भीमराव कोळी (वय ४३, रा. हॉकी स्टेडियमजवळ, नेहरूनगर, कोल्हापूर) व साथीदार युवराज मारुती खराडे (रा. हर्ष रेसिडेन्सी, उचगाव, ता. करवीर) याला अटक करण्यात आली. कागल पंचतारांकित एमआयडीसीजवळ लक्ष्मी टेकडीजवळ रक्कम घेताना स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने दोघांना पकडले. याबाबत अजिंक्य अनिल पाटील (वय ३१, रा. कळंबा) याने फिर्याद दिली होती.