प्रकाशअण्णा को इतना गुस्सा क्यों आता हैं?

प्रकाशअण्णा को इतना गुस्सा क्यों आता हैं?

इचलकरंजी (कोल्हापूर) : कोरोनामुळे वाढता मृत्युदर रोखण्यासाठी आयजीएम (Ichlkarnji IGM Hospital)३०० ऑक्सिजन बेडचे (300 Oxygen bed)परिपूर्ण सुविधांनीयुक्त रुग्णालय केले जाणार आहे. येत्या पंधरा दिवसात सिटीस्कॅन मशिन,आणखी एक ऑक्सीजन टॅंकसह अपुऱ्या कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती केली जाईल. आयजीएम तिसर्‍या लाटेचा सहज मुकाबला करेल, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ (Rural Development and Labor Minister Hasan Mushrif) यांनी व्यक्त केला. इचलकरंजीत कोरोनाचा वाढता मृत्यू दराच्या पार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ यांनी आयजीएम रुग्णालयास भेट देऊन आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Rural Development and Labor Minister Hasan Mushrif criticism on prakash awade kolhapur political news

मुश्रीफ म्हणाले," संपूर्ण देशात सर्वाधिक कोल्हापूर जिल्ह्याचा मृत्यूदर 3.5 आणि इचलकरंजीचा 4.2 टक्के आहे .टास्क फोर्सने दिलेल्या अहवालानुसार आयजीएमसह इचलकरंजीत नियंत्रण व उपाययोजना गरजेच्या आहेत. त्यामुळे मृत्यूदर रोखण्यासाठी वेळेत औषधांचा डोस, उपचार ,त्वरित कोरोना चाचण्यांसाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असणार आहे.आयजीएममध्ये नादुरुस्त 10 व्हेंटिलेटर रुग्णांच्या सेवेत येतील. ऑक्सिजन बेडमधील 10 बेड लहान मुलांसाठी राखीव ठेवले जाणार आहेत. रुग्णालयातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न आरोग्य राज्यमंत्री लक्ष घालून मार्गी लावतील .तिसरी लाट येण्यापूर्वी आयजीएम स्वयंपूर्ण बनून ऑक्सिजन व बेडची कमतरता भासणार नाही''.

जिल्ह्यात ऑक्सिजन व रेमडेसिवीरचा इंजेक्शनचा पुरवठा चौपट आहे. पालिका क्षेत्रात होम क्वारंटाईनवर भर कमी करण्यास सक्त सूचना केल्या आहेत. खाजगी दवाखान्यानी माणुसकीचे कर्तव्य जपून गरिबांना लुटू नये. नव्या म्युकर मायकोसिस रोगाचा समावेश महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत केला जाणार आहे. रविवारपासून कडक लॉकडाऊन केल्याने सर्वांनी घरीच रहावे. येत्या आठ दिवसात जिल्ह्यातून कोरोना नष्ट होईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अप्पर तहसीलदार शरद पाटील, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल, तहसीलदार प्रदीप उबाळे,पोलीस उपाधीक्षक बी.बी. महामुनी, गटविकास अधिकारी शबानाना मोकाशी, नगरसेवक मदन कारंडे ,राहुल खंजिरे,संजय कांबळे, शशांक बावचकर,अमित गाताडे आदी उपस्थित होते.

इतना गुस्सा क्यों ?

इचलकरंजीसाठी महाविकास आघाडी सरकार मदतीसाठी नेहमीच तत्पर असते.मात्र आमदार आवाडेंकडून वारंवार टीका केली जाते. प्रकाशअण्णा को क्यों गुस्सा आता हैं, असा टोला मंत्री मुश्रीफ यांनी लगावला. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर हाच टोला लगावत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा समाचार त्यांनी घेतला.

Rural Development and Labor Minister Hasan Mushrif criticism on prakash awade kolhapur political news

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com