कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय पातळीवरील औद्योगिक क्षेत्रात दर्जेदार उत्पादनांच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगांना आता रशिया, इस्त्राईलची दारे खुली झाली आहेत. .मशिनिंग, ऑटो पार्टस्, कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंगसह विविध क्षेत्रांना निर्यातीची संधी उपलब्ध झाल्याने या उद्योगांची गती वाढणार आहे. संयुक्त प्रकल्प राबविण्यासह तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण त्यांना करता येणार आहे..Kolhapur Viral Video : कोल्हापुरात हद्दपार गुंडाची जल्लोषात मिरवणूक, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी....भारत-इस्त्राईलमधील ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराने पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगांना त्यांच्या वाढीसाठी नवी दिशा मिळाली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील ऑटो-कंपोनंट्स, मशीन टूल्स, कास्टिंगला रशियामध्ये चांगली मागणी आहे..अन्नप्रक्रिया उद्योग, कृषी आणि कृषीपूरक क्षेत्राला लागणारे ट्रॅक्टर, पंपसेट्स, ड्रिप सिंचन उपकरणे त्याठिकाणी मागणी वाढत आहे. संरक्षण क्षेत्राला लागणारी उपकरणे, साधनांच्या निर्मितीसाठी येथील उद्योगांना इस्त्राईलसमवेत संयुक्त प्रकल्प राबविता येतील. .Kolhapur Viral Fight Video : हाण की बडीव! कोल्हापुरात कृषी प्रदर्शनात फ्री स्टाईल हाणामारी; घटनेचा व्हिडिओ व्हायरल.कृषी विषयक तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करता येणार आहे. या संधी साधण्यासाठी उद्योजकांनी तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासह निर्यातीचे नियोजन करून लवकर पावले उचलणे आवश्यक ठरणार आहे..म्हणून पश्चिम महाराष्ट्राला संधीकृषी उत्पादन, संरक्षण क्षेत्राला लागणारे साहित्य, कास्टिंग, ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स, असे सर्व काही एमएसएमई आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारे उद्योग पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत आहेत. .भविष्याचा वेध घेऊन ऑटोमोबाईल क्षेत्राला लागणाऱ्या सुट्या भागांच्या निर्मितीसह ईव्ही लागणाऱ्या ट्रान्समिशनमधील काही भागांसह अर्थमुव्हिंग, फूड इंडस्ट्रीज, संरक्षण क्षेत्राला लागणाऱ्या साहित्याचे उत्पादन उद्योजकांनी सुरू केले आहे. औद्योगिक क्षेत्रातील बऱ्यापैकी सर्व काही उपलब्ध असल्याने पश्चिम महाराष्ट्राला रशिया, इस्त्राईलमध्ये निर्यातीला अधिक वाव आहे..‘ओईएम’चे पुरवठादार होता येईल‘बिझनेस टू कस्टमर’ आणि ‘बिझनेस टू बिझनेस’ या दोन पद्धतीने रशिया, इस्त्राईलमध्ये उद्योग-व्यापार करण्याची कोल्हापूर ते पुणेपर्यंतच्या उद्योजकांना चांगली संधी निर्माण झाली आहे. हायड्रोलिक, ऑटोमोबाईल क्षेत्रांतील या दोन्ही देशांतील ओईएम (ओरिजिनल इक्विपमेंटस मॅन्युफॅक्चरींग) चे पुरवठादार म्हणून काम करता येणार असल्याचे सोमय्या टेक्नोचे हेमांग सोमय्या यांनी सांगितले.. ‘रशियातील उद्योग एनर्जी डेव्हलपमेंट, अर्थमुव्हिंगची साधने, ऑटोमोबाईल सेक्टर, मशिनिंग, आदी क्षेत्रांत संयुक्तपणे काम करण्यास आम्ही उद्योजक उत्सुक आहोत. रशिया, इस्त्राईलसाठी लागणारी बहुतांश उत्पादने पश्चिम महाराष्ट्रात उपलब्ध होण्यासारखी आहेत. ते लक्षात घेऊन उद्योजकांनी तयारी करणे आवश्यक आहे.- रोहन जाधव, प्रोप्रोरायटर, ऐस व्हॉल्व्ह.‘सीआय कास्टिंग, मशिनिंग, ऑटोमोबाईल-अर्थमुव्हिंग क्षेत्रांतील मोठ्या उद्योगांचे पुरवठादार होण्याची आणि संयुक्तपणे प्रकल्प राबविण्याची संधी पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांना उपलब्ध झाली आहे. त्याचा निश्चितपणे उद्योजकांना फायदा होणार आहे. उद्योगचक्राची गती वाढणार आहे. त्यात उद्योजकांनी क्लस्टर पद्धतीने कार्यरत राहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.- अविनाश चिकनीस.ओनर, अवीसन इंडस्ट्रीज‘रशिया हे संरक्षण, तर इस्त्राईल हे संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि त्याच्या विकासामध्ये आघाडीवर आहेत. या क्षेत्रातील नवी साधने, उत्पादनांच्या निर्मितीसाठी लागणारे इंजिनिअरिंग क्षेत्रातील विविध पार्टस् निर्मितीच्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्राला चांगली संधी आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील तंत्रज्ञानाबाबत इस्त्राईलचा आपल्याला चांगला उपयोग होईल.- अमर जाधव, अध्यक्ष, कोल्हापूर निर्यात प्रोत्साहन समिती.उद्योजकांनी काय करायला हवे?स्वतःचा पोर्टफोलिओ अधिक चांगल्या पद्धतीने तयार करावा.उत्पादन क्षमता अद्ययावत करावी. त्यात तंत्रज्ञान वापरावे.वेबसाईट, सोशल मीडिया आदी ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे नवे ग्राहक शोधावेत.क्लस्टर विकसित करून त्याद्वारे जगभरातील संपर्क वाढवावा.आपल्या देशातील रशिया, इस्राईलमधील एक्स्पोर्ट सेंटरमध्ये संपर्क वाढवावा..कोल्हापुरातील २०२४-२५ मधीलउद्योगक्षेत्रनिहाय निर्यात (कोटींमध्ये) उद्योगक्षेत्र निर्यातइंजिनिअरिंग १८३२ टेक्सटाईल १६९० ॲग्रो अँड फूड प्रोसेसिंग १४१ इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिक्ल ३८७.मेटावेअर २१३ जेम्स अँड ज्वेलरी १९१ ॲग्रीकल्चर अँड होर्टिकल्चर १४४ केमिकल्स ७७होम डेकोर ७५ पेपर प्रॉडक्टस ५१.कोल्हापुरातून देशनिहाय होणाऱ्या निर्यातीची टक्केवारीयुएसए ४२.२७ टक्केयुएई ८.१०इटली ४.२६चीन २.५२जर्मनी ३.६६.युके ३.९०कोरिया ३.१५दक्षिण आफ्रिका १.८३नेदरलँड २.१०केनिया २.०५मेक्सिको २.१९बांगलादेश १.९६ .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.