

Communication Challenge Handled with Sensitivity
sakal
कागल : जन्मत: मूकबधिर असलेल्या गरोदर मातेची प्राथमिक आरोग्य केंद्र कसबा सांगाव येथे सुरक्षित प्रसूती करून आरोग्य विभागाने संवेदनशील व माणुसकीचे दर्शन घडवले. २० डिसेंबर रोजी सौ. अश्विनी प्रदीप आवळे (वय २५, खेप दुसरी, रा. कसबा सांगाव) यांना दुपारी बारा वाजता १०२ रुग्णवाहिकेद्वारे प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते.