संभाजीराजेंच्या हाकेला साद; सकल मराठा समाज राजेंच्या पाठिशी

संभाजीराजेंच्या हाकेला साद;  सकल मराठा समाज राजेंच्या पाठिशी

कोल्हापूर : खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (MP Yuvraj Sambhaji Raje Chhatrapati)यांनी रायगडावरुन (Raigad)सोळा जूनला जाहीर केलेल्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत, त्याच्या तयारीसाठी दहा जूनला शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे सकाळी अकरा वाजता बैठक होणार असल्याची माहिती कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी आज येथे दिली. संभाजीराजेंचे नेतृत्व मान्य करत, संभाजीराजे छत्रपती घराण्याचे वंशज असल्याने त्यांनी आत्मक्लेश आंदोलन करू नये, अशी मागणीही करण्यात आली.

(sakal-maratha-samaj-with-the-support-of-the-mp-yuvraj-sambhaji-raje-chhatrapati-kolhapur-news)

यावेळी महेश जाधव म्हणाले ,"महाराष्ट्राची दिशा ठरविणारा हा मोर्चा असेल. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील मराठा समाजाने या मोर्चात सहभागी होऊन एकजूट दाखवावी. संभाजीराजे यांनी ज्या पाच मागण्या केल्या आहेत, त्याची पूर्तता सरकारने लवकर करावी. अन्यथा १६ जूनला निघणाऱ्या मोर्चाने सरकारला जाग आणली जाईल."

दिलीप पाटील म्हणाले, "मराठा आरक्षण संपविण्यासाठी आयोग नेमण्यात आले आहेत. त्यातील सदस्य जातीयवादी आहेत. त्यामुळे आयोग बरखास्त करण्यात यावेत. मराठा समाजाची सहनशीलता संपली असून, मराठा समाजाला आक्रमक होण्याकरिता आता पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे सरकारने वेळीच मागण्या मान्य करून मराठा समाजाला दिलासा द्यावा."निवास साळोखे, बाबा पार्टे, फत्तेसिंह सावंत, बाळ घाटगे, सचिन तोडकर, दिलीप देसाई, स्वप्नील पार्टे, सुशील भांदिगरे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com