
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय परिसरातील इमारतींच्या नूतनीकरणासाठी आणलेल्या सळींसह अन्य साहित्यांची चोरी करून विक्री करणारी टोळी परिसरात कार्यरत झाली आहे. यात बहुतांशी महिला सहभागी असून, त्यांच्या कामावर देखरेखेसाठी नेमलेले सुपरवायझर आणि काही सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही हात आहे.